पुढारी ऑनलाईन डेस्कः उत्तराखंड येथून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने मुलीला जन्म दिला म्हणून संबधित महिलेच्यास पतीने तीला हातोडा व स्क्रू ड्रायव्हरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या पतीला आपल्या पत्नीने मुलग्याला जन्म द्यावा अशी इच्छा होती पण त्या महिलेला मुलगीच झाली, यामुळे पतीची चांगलीच तडकली व त्याने रागाच्या भरात पत्नीला जबर मारहाण केली यामध्ये त्याने हातोडा व स्क्रू ड्रायव्हरचाही वापर केला. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला होता आता या घटनेची फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे.
या घटनेतील पिडीत महिलेने सांगितले की नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांचे लग्न झाल्यानंतर काहीच दिवसात हुंड्यासाठी पती व त्याच्या कुंटुंबाने तिला त्रास देण्यास सुरु केले. हे गेले दोन वर्षे सुरुच आहे त्यातच या विवाहितेला मुलगी त्यानंतर तर परिस्थिती आणखी बिघडली.
या महिलेला मारहाण झाल्यानंतरही तिने पोलिसांकडे तक्रार दिली पण पोलिसांनी संबधितांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पिडीत महिलेने मुख्यमंत्री सहायता कक्ष व महिला हेल्पलाईन तसेच राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. यानंतर याची दखल घेत पोलिसांनी ३० मार्च रोजी संबधित पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या पतीला शिक्षा व्हावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. आपल्याला पोटगी द्यावी लागेल या भितीने सासरच्या मंडळीने आपल्याला संपवन्याचा कट रचल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे. ‘कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने मला घरी बोलावले व माझ्यावर हल्ला केला पण मी ओरडल्यामुळे माझी सुटका झाली’ यावेळी पतीने मला हातोड्याने मारहाण व स्क्रू - ड्रायव्हरने भोसकले असे या महिलेने म्हटले आहे. मला नेहमीच मारहाण केली जायची व मुलगाच हवा अशी मागणी केली जायची पण मुलगा झाला नाही म्हणून मला घराबाहेर काढण्यात आले. असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.