पुढारी ऑनलाईन डेस्क: मंत्रीमंडळ खातेवाटपावर दिल्लीत आज (दि.६जून) सकाळपासूनच बैठकांचे सत्र सुरू आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एनडीए सरकारचा फॉर्म्युला (NDA leaders meeting) ठरला असल्याचे समजते. यामध्ये मंत्रीमंडळातील ४ प्रमुख महत्त्वाची खाती भारतीय जनता पक्ष स्वत:कडेच ठेवणार आहे, असे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीला ४ कॅबिनेट मंत्रीपद तर नितीशकुमारांच्या जेडीयूला ३ मंत्रीपदे देण्याची तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला १ कॅबिनेट आणि १ राजमंत्री पद मिळणार अशी चर्चा आहे. मित्रपक्षांना प्रत्येक ४ खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद दिले जाईल, अशीही माहिती समोर (NDA leaders meeting) आली आहे.
लोकसभा निकालानंतर आज (दि.६ जून) एनडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत सुरु आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळ खातेवाटपासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे (BJP) मुख्य नेते नरेंद्र मोदी यांनी खातेवाटपासाठी ३ नेत्यांकडे जबाबदारी दिली असल्याचे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे. अमित शहा, राजनाथ सिंह आणि जे. पी नड्डा या तीन नेत्यांवर केंद्रीय मंत्रिमंडळ खातेवाटपाची जबाबदारी जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.