प्रातिनिधिक छायाचित्र.   (Representative image)
राष्ट्रीय

पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍याचा मास्‍टरमांइड सैफुल्‍ला खालिद आहे तरी कोण?

Pahalgam Terror Attack : दहशतवादी हाफिज सईदचा निकटवर्ती, पाकिस्‍तान लष्‍कराचा हस्‍तक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी (दि.२१) दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्‍याड हल्‍ला. या घटनेने संपूर्ण देशभरात संतपाचाी लाट उसळली आहे. द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ( The Resistance Front) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गुप्तचर संस्थांच्या माहिती नुसार, लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिद हा कट रचणाऱ्यांपैकी एक असल्याचा संशय आहे.

'टीआरएफ' ही पाकिस्‍तानमधील दहशतवादी संघटना 'लष्‍कर-ए-तोयबा'ची संघटनेची संलग्‍न संघटना आहे. या हल्‍ल्‍याचा मास्‍टरमांइड (सूत्रधार) दहशतवादी सैफुल्ला खालिद असल्‍याचे माहिती समोर आली आहे. दहशतवादी हाफिज सईदचा हस्‍तक अशी ओळख सैफुल्‍ला जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा आणि टीआरएफच्या म्‍होरक्‍या आहे. अमेरिकेच्या ट्रेझरीनुसार, ८ ऑगस्ट २०१७ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत खालिदची ओळख एमएमएलच्या अध्यक्ष म्हणून करण्यात आली. त्यांनी पक्षाच्या स्थापनेबद्दल, उद्दिष्टांबद्दल आणि उद्दिष्टांबद्दल बोलले. खालिद हा लष्कर-ए-तोयबाच्या पेशावर मुख्यालयाचा प्रमुख देखील आहे. मध्य पंजाब प्रांतासाठी जमात-उद-दावा (जेयूडी) च्या समन्वय समितीत काम करत होता. एप्रिल २०१६ मध्ये परराष्ट्र विभागाने जमात-उद-दावाला लष्कर-ए-तोयबाचे उपनाम म्हणून नियुक्त केले होते आणि डिसेंबर २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या १२६७/१९८८ मंजुरी यादीत लष्कर-ए-तोयबाचे उपनाम म्हणून समाविष्ट केले गेले होते.

पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध भडकवले

सैफुल्ला खालिद हा पाकिस्तानी लष्कराच्या हस्‍तक आहे. लष्करी अधिकाऱ्यांना तो मदत करो. दोन महिने आधी सैफुल्ला खालिद पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूरला गेला होता. येथे त्‍याने पाकिस्तानी लष्कराचे कर्नल जाहिद जरीन खट्टक याच्‍याबरोबर जिहादी भाषण दिले. पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध भडकवले.

सैफुल्ला राहतो सुरक्षा कवचात

द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचा म्‍होरक्‍या सैफुल्ला खालिद हा सैफुल्ला कसुरी या नावाने ओळखला जातो. त्‍याला आलिशान गाड्यांचा शौक असल्याचे म्हटले जाते. तो अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या लष्कर दहशतवाद्यांच्या सुरक्षा कवचात राहतो.

२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर ताब्यात घेण्‍याची वल्‍गना

एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याच्या बैठकीत सैफुल्‍ला खालिदने वल्‍गना केली होती की, मी वचन देतो की आज २ फेब्रुवारी २०२५ आहे. आम्ही २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर ताब्यात घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. येणाऱ्या काळात भारतावर आमचे हल्ले तीव्र होतील. २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर स्वतंत्र होईल. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी जमले होते.

अबोटाबादमध्ये दहशतवादी तळ उभारला

सैफुल्ला खालिद हा गेल्या वर्षी अबोटाबादच्या जंगलातील दहशतवादी छावणीत होता. या शिबिरात शेकडो पाकिस्तानी युवकांनी भाग घेतला होता. लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखा पीएमएमएल आणि एसएमएलने या शिबिराचे आयोजन केले होते. दहशतवादी हल्ल्यांसाठी युवकांची निवड करण्यात आली. सैफुल्लाहने भारताविरुद्ध भडकाऊ भाषण देऊन मुलांना भडकावले होते. हे युवक पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने सीमेपलीकडून घुसखोरी केल्याचेही समोर आले आहे.

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये 'टीआरएफ'ने बस्‍तान बसवले कसे ?

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्‍या पुलवामा हल्ल्यानंतर 'टीआरएफ'ने जम्‍मू-काश्‍मीर आपले बस्‍तान बसवण्‍यास सुरुवात केली. हळूहळू या संघटनेने आपली ताकद वाढवू लागली. तिला पाकिस्‍तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'सह काही पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार बहाल करणारे कलम ३७० हटवताच, ही संघटना संपूर्ण काश्मीरमध्ये सक्रिय झाल्‍याचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT