Who is IPS B Sumathi Pudhari
राष्ट्रीय

Who is IPS B Sumathi: कोण आहेत IPS बी सुमती? मध्यरात्री बसस्टॉपवर एकट्याच उभ्या; 3 तासांत 40 पुरुषांनी घेरलं, काय घडलं?

Who is IPS B Sumathi: बी सुमती यांनी महिलांच्या सुरक्षेची वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी मध्यरात्री अंडरकव्हर ऑपरेशन केलं. तीन तासांत जवळपास 40 पुरुषांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.

पुढारी वृत्तसेवा

IPS B Sumathi Women Safety Experiment: महिलांच्या सुरक्षित आहेत का हे जाणून घेण्यासाठी हैदराबादमध्ये एक धाडसी प्रयोग करण्यात आला. मलकाजगिरीच्या पोलिस आयुक्त बी. सुमती यांनी स्वतः अंडरकव्हर ऑपरेशन करत मध्यरात्री बसस्टॉपवर एकटं उभं राहून शहरातील महिलांच्या सुरक्षेची परिस्थिती तपासली.

हा विशेष प्रयोग रात्री 12.30 ते पहाटे 3.30 या वेळेत करण्यात आला. यावेळी सुमती यांनी कोणतीही पोलिस सुरक्षा घेतली नव्हती. सामान्य नागरिकांप्रमाणे साध्या कपड्यांमध्ये त्या मलकाजगिरी परिसरातील बसस्टॉपवर उभ्या राहिल्या. महिलांना रात्री सार्वजनिक ठिकाणी कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा त्यामागचा उद्देश होता.

या तीन तासांच्या काळात जवळपास 40 पुरुष त्यांच्याजवळ आले. काहीजण मद्यधुंद अवस्थेत होते, तर काहींनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे समोर आले. त्यामध्ये तरुण आणि विद्यार्थ्यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, ते ज्या महिलेशी बोलत होते किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत होते, त्या एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

शिक्षा नाही, समुपदेशनावर भर

या ऑपरेशननंतर पोलिसांनी संबंधित सर्व व्यक्तींची ओळख पटवली. मात्र, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आले. महिलांप्रती आदर, सार्वजनिक ठिकाणी वर्तन आणि सुरक्षेबाबत त्यांना कठोर इशारा देण्यात आला. पोलिसांच्या मते, केवळ शिक्षा देण्यापेक्षा मानसिकता बदलणं अधिक महत्त्वाचं आहे.

आधीही केलं होतं ऑपरेशन

हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. जवळपास 25 वर्षांपूर्वी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काजीपेट रेल्वे स्थानक परिसरात DSP म्हणून काम करत असताना सुमती यांनी अशाच प्रकारचं अंडरकव्हर ऑपरेशन केलं होतं.

कोण आहेत IPS बी. सुमती?

बी. सुमती या तेलंगणा कॅडरमधील वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. नुकत्याच त्या मलकाजगिरीच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्त बनल्या आहेत. त्यांनी यापूर्वी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती. माओवादी आत्मसमर्पण मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच पोलिसिंगमध्ये AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठीही त्या ओळखल्या जातात. या संपूर्ण घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT