बाप्पांच्या विसर्जनावेळी रडणाऱ्या मुलाच्या व्हिडिओने लोक भावूक; कोण आहे बालक संत? File Photo
राष्ट्रीय

बाप्पांच्या विसर्जनावेळी रडणाऱ्या मुलाच्या व्हिडिओने लोक भावूक; कोण आहे बालक संत?

गणपती बाप्पांवरची बालक संतची श्रद्धा पाहून लोक भावूक

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :

गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन हा फक्‍त एक सण नाही तर, एक भावना, श्रद्धाही आहे. तर त्‍याच्या भक्‍तांसाठी एक माेठा सणही आहे. ज्‍या आनंदाने आणि उत्‍साहाने गणरायाचे स्‍वागत करण्यात येते, त्‍याच प्रमाणे गणरायाच्या विसर्जनानंतर त्‍याच्या भक्‍तांची मणेही कोमेजून जातात. ती उदास होतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्‍यामध्ये एक विसर्जनासाठी आलेला बालक गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून रडत आहे.

तसेच जेंव्हा पुजारी गणपतीची मूर्ती विसर्जित करण्यासाठी जवळ जातो, तेंव्हा तो बालक मूर्तीला बिलगून रडू लागतो. हा भावविभोर करणारा क्षण इंटरनेटवर व्हायरल होत असून, यूजर्सच्या काळजाचा ठाव घेत आहे. कमेंट बॉक्‍समध्ये लोक या व्हिडिओवर माेठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनवची बाप्पांप्रती श्रद्धा पाहून यूजर्सही कमेंट करत आहेत. एकाने लिहिले की, गणरायाचे आगमण हा केवळ एक सण नाही, तर अनेकांसाठी हा भावनात्‍मक क्षण आहे. दुसऱ्याने लिहिलंय की, एवढ प्रेम केवळ परमेश्वराप्रती लावणच योग्‍य आहे. तिसऱ्याने लिहिलंय की, याला म्‍हणतात निस्‍वार्थ प्रेम. तर आणखी एकाने म्‍हंटलंय की, गणपती बाप्पा मोरया...

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या बालकाचे नाव अभिनव अरोडा आहे. तो एक अध्यात्‍मिक वक्‍ता आहे. या व्हिडिओमध्ये हा मुलगा गणपतीच्या मूर्तीसमोर बसून रडताना दिसताे. या दरम्‍यान तो पुढच्या वर्षी लवकर या... बाप्पा... म्‍हणून तो गणपती बाप्पांना विनवत आहे. तो गणपती बाप्पांना लाडू भरवताना घट्ट पकडून ठेवून रडत असल्‍याचे दिसून येत आहे. एका भक्‍ताचा आपल्‍या आराध्य देवाप्रती असणारी ही श्रद्‍धा भक्‍तांच्या हद्ययाचा ठाव घेत आहे.

जेंव्हा पुजारी मूर्तीला विसर्जित करण्यासाठी पुढे येतात. तेंव्हा गणरायाच्या मूर्तीला बिलगुन हा चिमुकला मुलगा रडायला लागतो. जवळपास ७१ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत मुलाची देवाप्रतीची श्रद्धा आणि समर्पण पाहून यूजर्सच्या मनाला हा बालक भावला.

अभिनव विषयी जाणून घ्‍या...

अभिनव अरोडा हा (९ वर्षीय) बालक आहे. तो एक अध्यात्‍मिक कंटेंट क्रिएटर आहे. इंस्‍टाग्रामवर त्‍यांचे तब्‍बल ९३ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. या प्लॅटफॉर्मवर अभिनव हिंदू सण, उत्‍सव साजरे करताना, धार्मिक गुरूंच्या भेटी घेतानाचे फोटो, व्हिडिओ पोस्‍ट करत असताे.

अभिनव यांना त्‍यांचे फॉलोअर्स प्रेमाने 'बाल संत' या नावानेही बोलवतात. अभिनव अरोडा हा दिल्‍लीतील ९ वर्षीय अध्यात्‍कि सामग्री निर्माताही आहेत. त्‍यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्‍ते भारतातील सर्वात कमी वयाचे अघ्‍यात्‍मिक वक्‍ता म्‍हणून सन्मानित करण्यात आले आहे. अभिनवचे वडील तरूण राज हे त्‍याचे अकाउंट मॅनेज करतात. ते इंटरप्रेन्योर, लेखह आणि TEDx स्‍पीकर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT