राष्ट्रीय

Weather Update | ‘या’ राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दोन दिवस आधीच गुरुवारी (दि.३० मे) मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात दाखल झाला. दरम्यान दक्षिण पूर्व भारतात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील काही राज्यांत सोमवारपर्यंत (३ मे) अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Weather Update) दिला आहे.या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

भारतातील अरुणाचल प्रदेश केरळ आणि माहे, उप हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये १ ते ३ जून दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

IMD ने केरळमधील त्रिशूर, मलप्पुरम आणि कोझिकोडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच इडुक्की आणि वायनाडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर केरळच्या उत्तर भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT