Supreme Court | आता पॅकबंद पदार्थांवरील इशारा लेबलबाबत आम्हीच आदेश देणार Pudhari Photo
राष्ट्रीय

Supreme Court | आता पॅकबंद पदार्थांवरील इशारा लेबलबाबत आम्हीच आदेश देणार

मुलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य : सर्वोच्च न्यायालय

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पॅकेज्ड खाद्यपदार्थांतील चरबी, साखर आणि मिठाच्या प्रमाणाबाबत ठळक शब्दांत इशारा लेबल छापावे, या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रीय अन्‍न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला (एफएसएसएआय) कडक शब्दांत फटकारले. तसेच, या विषयाचा पुरेसा अभ्यास न्यायालयाने केला असून आता आम्हीच यावर आदेश देणार आहोत, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

थ्री एस अँड अवर हेल्थ सोसायटीने लेबलिंगसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने या प्रकरणाला ‘राष्ट्रीय हिताचा मुद्दा’ म्हटले असून प्रामुख्याने वाढत्या वयातील मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने आम्हा यावर त्वरित लेखी आदेश जारी करणार असल्याचे सांगितले. यावरील पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

दर्शनी भागावरच इशारा लेबल छापा

सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी लोकप्रिय स्नॅक्सच्या पाकिटांचा संदर्भ दिला. खंडपीठाने स्पष्ट केले की, या पॅकेटच्या मागच्या बाजूला अतिशय बारीक अक्षरात लिहिलेली माहिती सामान्य ग्राहकांना किंवा लहान मुलांना समजत नाही. त्यामुळे पाकिटाच्या दर्शनी भागावरच अतिरिक्त चरबी (हाय फॅट), अतिरिक्त साखर (हाय शुगर), अतिरिक्त मीठ (हाय सॉल्ट) असे ठळकपणे लिहिणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT