पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीत दुहेरी हत्याकांडात वॉन्टेड असलेल्या कुख्यात शूटर अनिल उर्फ सोनू मटका हा आज (दि.१४) पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. याने काही दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाची भरदिवसा हत्या केली होती.
मेरठ जिल्ह्यातील टीपी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हाशिम बाबा टोळीचा कुख्यात शूटर सोनू मटका लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला अटक करण्यासाठी आज सकाळी उत्तर प्रदेश विशेष कृती दल आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अधिकारी गेले. यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात सोनू मटका हा जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यता आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू मटका याच्यावर उत्तर प्रदेश आणि दिल्लीत लुटमारीसह खुनाचे गुन्हा दाखल होते. तोऑक्टोबर महिन्यात दिल्लीत झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी होता. त्याच्यावर एक 30 बोअर पिस्तूल, एक 32 बोअर पिस्तूल, 10 जिवंत काडतुसांसचह एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.