देशातील गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे सन २००० ते २००५ या काळात तब्बल पाच लाख लोक मृत्युमुखी पडले, असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला असून, हे संशोधन जगप्रसिद्ध अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
गिधाडे प्रामुख्याने पक्षी आणि प्राण्यांच्या मृतदेहांचा फडशा पाडतात. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट नैसर्गिक पद्धतीने लावली जाते, गिधाडेच कमी झाल्यामुळे प्राण्यांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली, त्यातून रोगप्रसारक द्रव (पॅथोजन्स) पसरण्यास सुरुवात झाली. हेच पॅथोजन्स पावसाच्या पाण्याने नदी-नाल्यांपर्यंत पोहोचले आणि पाणी प्रद्धित झाले.
शिवाय, गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे प्राण्यांचे मृतदेह नैसर्गिकरीत्या नष्ट करण्याची प्रक्रिया थांबली त्यामळे या कुजलेल्या मतदेहांचा प्रश्न गंभीर बनला. मृतदेहांच्या सभोवताली काही किलोमीटरपर्यंत दुर्गंधी पसरू लागली. त्यावर कुत्र्यांची गर्दी वाढून त्यांच्यामार्फतही रोगराई पसरण्यास सुरुवात झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे सरकारने मृतदेह नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर करण्याचा आदेश दिला. ही मृतदेह कुजविणारी रसायनेदेखील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये गेली.
थोडक्यात, गिधाडे नसल्यामुळे या प्रश्नातील गंतागंत वाढतच गेली प्रत्येक प्राण्याचे महत्त्व शिकागो विद्यापीठाच्या 'हरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी'मधील सहायक प्राध्यापक इयाल फ्रैंक हे या संशोधनाचे सहलेखक आहेत. ते म्हणाले, गिधाडांना निसर्गाचे स्वच्छता सेवक मानले जाते; कारण ते मृत प्राण्यांचे बॅक्टेरियायुक्त मृतदेह आणि रोगप्रसारक जीवाणू खातात.
गिधाडे नसतील, तर ही प्रक्रिया थांबते आणि रोगजन्य जीवाणंचा प्रसार होतो आपल्या सष्टीत प्रत्येक प्राणी आणि पक्ष्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ते आपल्या जीवनावर थेट परिणाम करतात. त्यामुळे केवळ सुंदर दिसणाऱ्या प्राणी-पक्ष्यांनाच नव्हे, तर सर्वांनाच जपणे आपली जबाबदारी आहे. या संशोधनाचे सहलेखक अनंत सुदर्शन आहेत.
दोघांच्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले की, भारतात श्वानदंशामुळे (रेबीज) मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. प्राण्यांचे मृतदेह कुत्र्यांनी खाल्ल्याने कुत्र्यांना रेबीज झाला आणि त्यांनी माणसांना चावे घेतल्याने रोग माणसांपर्यंत पोहोचला. श्वानदंशावरील लसीच्या विक्रीनेही या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे. शहरी भागात कचरा डेपोंमुळे हे प्रमाण मोठे आहे. यामुळे वर्षाकाठी तब्बल एक लाख लोकांना जीव गमवावा लागत आहे. यातून देशाला तब्बल ७० अब्ज डॉलरचा फटका बसला असल्याचे या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे. गिधाडे लुप्त होत चालल्यामुळे माणसाचाही जीव धोक्यात आला असून, आजारांवरील उपचारांचा मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे, असे अनंत सदर्शन यांनी म्हटले आहे.
देशातील गिधाडांची संख्या कमी होण्यास १९९४ मध्ये सुरुवात झाली. गायी-म्हशींवरील उपचारांसाठी पशुवैद्यकीय औषध 'डिक्लोफिनॅक' चा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. या जनावरांच्या सान्निध्यात राहणाऱ्या गिधाडांसाठी हेच औषध मारक ठरले, या औषधामुळे गिधाडांचे मूत्रपिंड निकामी होत असल्याचे संशोधन त्यावेळी करण्यात आले होते. याच कारणाने देशात गिधाडांचा वेगाने हास सुरू झाला. मात्र, त्यांच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत.