Election Commission reply Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत घेत मतदारांची नावे हटवल्याचे केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) फेटाळून लावला आहे. कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाइन पद्धतीने हटवता येत नाही, असा दावा करत राहुल गांधी यांचे आरोप आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे आयोगाचे आयोगाने म्हटलं आहे. दरम्यान, कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातून मतदारांची नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, हे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. मात्र, या प्रकरणाची दखल घेत आयोगाने स्वतःहून गुन्हा (FIR) दाखल केल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. कोणताही मतदार ऑनलाइन हटवला जाऊ शकत नाही, अशी चुकीची धारणा राहुल गांधी यांनी तयार केली आहे. संबंधित व्यक्तीला संधी दिल्याशिवाय कोणताही बदल किंवा नाव हटवणे शक्य नाही."
कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातून मतदारांची नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, हे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. मात्र, या प्रकरणाची दखल घेत आयोगाने स्वतःहून गुन्हा (FIR) दाखल केल्याचेही आयोगाने स्पष्ट केले. रेकॉर्डनुसार, आळंद विधानसभा मतदारसंघात २०१८ मध्ये भाजपचे सुभाष गुत्तेदार आणि २०२३ मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील विजयी झाले होते."
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेत गंभीर गोंधळ झाल्याचे आरोप केले आहेत. त्यांनी यावेळी तंत्रज्ञानाच्या मदतीनं वोटर डिलीशन कशाप्रकारे केलं जातं हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे पुरावे सादर करत सांगितलं. त्यांना दावा केला की निवडणूक आयोग अशा प्रकारे वोटर डिलीट करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. कर्नाटक सीआयडीनं निवडणूक आयोगाला १८ पत्रं पाठवली मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही असा दावा केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्याला ही सर्व माहिती मिळवण्यात निवडणूक आयोगातीलच एका व्यक्तीनं मदत केल्याचा दावा देखील त्यांनी केला.