Volodymyr Zelenskyy India Visit: रशियाचे राष्ट्रपती व्बादिमीर पुतीन हे नुकतेच दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या माध्यामातून रशिया आणि भारतानं जगाला अनेक अप्रत्यक्ष संदेश दिले होते. आता भारतानं अजून एक कुटनैतिक चाल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादिमीर झेलेन्स्की यांनी देखील भारत दौरा करावा यासाठी भारत प्रयत्न करत आहे. कुटनैतिक विश्वात भारताचा हा समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की हे जानेवारी २०२६ मध्ये भारत दौऱ्यावर येण्याची शक्यात आहे. या दौऱ्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. इंडिययन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारत अनेक आठवड्यापासून युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयासोबत संपर्कात आहे. भारताची झेलन्स्की यांचा भारत दौरा घडवून आणण्यासाठी पुतीन भारतात येण्यापूर्वीपासूनच प्रयत्न सुरू आहेत.
जर झेलन्स्की यांनी भारताचा दौरा केला तर रशिया युक्रेन युद्धात दोन्ही देशांशी संपर्कात राहण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. भारत या कुटनैतिक धोरणावर अनेक महिन्यांपासून चालत आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ मध्ये मॉस्कोला गेले होते अन् पुतीन यांना भेटले होते. त्यानंतर एका महिन्यानं ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचा देखील दौरा केला होता.
दरम्यान, आता युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचा दौरा किती काळासाठी असणार आहे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची शांती योजना कशी पुढे सरकते. युद्धाची स्थिती कशी आहे त्यावर झेलेन्स्की यांच्या दौऱ्याचे स्वरूप ठरेल.
युक्रेनच्या देशांतर्गत राजकारणात देखील मोठा घडामोडी घडत आहेत. झेलेन्स्की सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांचे सरकार सध्या एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे दबावात आहे. याचा प्रभाव झेलेन्स्की यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्यावर पडू शकतो. विशेष म्हणजे युक्रेनच्या राष्ट्रपतींना यापूर्व फक्त तीनवेळा भारत दौरा केला आहे. यापूर्वी युक्रेनचे राष्ट्रपती १९९२, २००२ आणि २०१२ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते.
दरम्यान, पुतीन यांच्या भारत दौऱ्यावर युरोपची करडी नजर होती. त्यांनी भारताने रशियाला युद्ध संपवण्यासाठी दबाव निर्माण करावा अशी आग्रही मागणी केली होती. भारतानं देखील कोणत्याही मुद्द्यावर चर्चा आणि कुटनीतीच्या मार्गानं उत्तर शोधणं हा एकमेव योग्य पर्याय असल्याचं सातत्यानं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तटस्थ नाही तर शांततेच्या बाजूनं आहे. त्यांनी युक्रेन युद्धावर भारताची भूमिका आधीच स्पष्ट केली होती.