लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला. Twitter
राष्ट्रीय

Fact-Check : लोकसभा अध्‍यक्षांची मुलगी UPSC परीक्षा न देताच झाली आयएएस?

पुढारी वृत्तसेवा

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( om birla) यांची मुलगी अंजली बिर्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची ( UPSC) परीक्षा न देताच आयएएस अधिकारी झाल्‍या आहेत, असा दावा करणार्‍या पोस्‍ट सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. वडिलांच्‍या पदाचा अंजली यांना फायदा झाल्‍याचा दावाही या पोस्‍टमधून करण्‍यात येत आहे. जाणून घेवूया या मागील नेमकं सत्‍य काय आहे...

UPSC वेबसाइटनुसार, अंजली बिर्ला यांनी २०१९ मध्‍ये UPSC परीक्षा दिली होती. त्‍यांचे नाव आणि परीक्षा नंबर - 0851876 होता.

नेमकी वस्‍तुस्‍थिती काय?

UPSC वेबसाइटनुसार, अंजली बिर्ला यांनी २०१९ मध्‍ये UPSC परीक्षा दिली होती. त्‍यांचे नाव आणि परीक्षा नंबर - 0851876 होता. एकूण १७५० गुणांच्‍या परीक्षेत ७७७गुण मिळवत त्‍या उत्तीर्ण झाल्‍या होत्‍या. मुलाखतीमध्‍ये त्‍यांना २७५ पैकी १७६ गुण मिळाले होते. त्‍यांना या परीक्षेत एकूण ९५३ गुण मिळाले होते. तथापि, त्‍यांचा परीक्षा क्रमांक हा जाहीर केलेल्या राखीव यादीत होता.UPSC दरवर्षी नियम 16 ​​(4) आणि (5) नुसार राखीव यादी प्रसिद्ध करते, UPSC ला शेवटच्या शिफारसीपेक्षा कमी गुणवत्तेच्या क्रमाने एकत्रित राखीव यादी राखणे अनिवार्य करते. त्‍यामुळे अंजली बिर्ला यांचे अधिकृत यादीत राखीव म्‍हणून होते.

अंजली बिर्ला या सध्या रेल्वे मंत्रालयात कार्यरत आहेत. त्‍यांचे शालेय शिक्षण राजस्‍थानमधील कोटा येथील सोफिया स्कूलमधून झाले. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून राज्यशास्त्र (ऑनर्स) चे शिक्षण घेतले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्‍या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. त्‍यामुळे अजंली बिर्ला यांच्‍याबाबत व्‍हायरल असणार्‍या पोस्‍टमधील माहिती चुकीची असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT