Viral News 
राष्ट्रीय

Viral News | काकाला लग्नाचे निमंत्रण नाही! रुसलेल्या काकाने नवरदेवाच्या घराचा दरवाजा वेल्डिंग करुन बंद केला!

काकाच्या अजब प्रकारने वरात घेऊन आलेल्या नवरदेवाची पंचाईत, उत्तर प्रदेशमधील घटनेने सारेच अवाक, पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजाचे वेल्डिंग तोडण्यात आले

Namdev Gharal

Viral News लग्न समारंभ म्हणजे रुसवे फूगवे हे आलेच. प्रत्‍येक ठिकाणी हे चित्र दिसते लग्नातील वऱ्हाडी मंडळी कधी मानपानावरुन रुसतात तर महिला दिलेल्या साड्यांवरून पण आता उत्तर प्रदेशातून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एका नवरदेवाने आपल्या लग्नाचे आमंत्रण काकाला दिले नाही. याचा राग मनात धरुन काकाने उचचले असे पाऊल की सर्वजण अवाकच झाले आहे. याची आता सोशल मिडीयावर खंमगपणे चर्चा सुरु आहे.

वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला बसला झटका

उत्तर प्रदेशातील जालौनमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. जेव्हा एका काकाला त्याच्या भाच्याच्या लग्नाचे आमंत्रण दिले नाही, तेव्हा तो संतापला. वधू-वरांचे स्वागत करण्यासाठी त्याने इतक्या फसव्या मार्गांचा अवलंब केला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. वधूला निरोप देऊन जेव्हा नवरदेव घरी परतला, तेव्हा त्याला घराचा दरवाजा वेल्डिंगने बंद केलेला आढळला. नंतर असे उघड झाले की हे कृत्य त्याच्याच काकाने केले होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर दरवाजा उघडण्यात आला आणि वधूचे घरात स्वागत करण्यात आले. पण वरात दारात घेऊन आलेल्या नवरदेवाला मात्र दरवाजा चक्क वेल्डिंगने बंद केलेला पाहून चांगलाच झटका बसला.

काका रुसला दरवाजा वेल्डिंग केला

ही घटना उत्तर प्रदेशातील जालौन कोतवाली भागातील नारो भास्कर गावात घडली. नारो भास्कर या गावातील रहिवासी असलेल्या मुहम्मद मजीद याचे लग्न होते त्‍याने कौटूंबिक वादातून त्याचा काका मुहम्मद अझर याला लग्नाचे निमंत्रण दिले नव्हते. यामुळे संतापलेल्या काकाने नवरदेवाच्या घराचा मुख्य दरवाजा वेल्डिंग करून बंद केला. जेव्हा नवरदेव वधूसह आला, तेव्हा ते दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले.

काही वेळाने हे कृत्‍य रुसलेल्या काकांनीच केल्याचे लक्षात आल्यावर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पण घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांच्या उपस्थित दरवाजाला वेल्डिंग केलेले तोडण्यात आले. यानंतरच वधूचा घरात प्रवेश झाला .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT