झारखंडमध्ये होळी मिरवणुकीदरम्यान दोन गटांत हाणामारी! अनेक जण जखमी Pudhari Photo
राष्ट्रीय

झारखंडमध्ये होळी मिरवणुकीदरम्यान दोन गटांत हाणामारी! अनेक जण जखमी

Jharkhand Holi violence| अनेक दुकाने आणि वाहनांची जाळपोळ

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात शुक्रवारी (दि.14) होळी मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षात अनेक लोक जखमी झाले आणि किमान तीन दुकानांना आग लावण्यात आल्याचे वृत्त आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, परिसरात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे, त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. घोडाथांबा येथे ही घटना घडली जेव्हा एका गटाने परिसरातून जाणाऱ्या होळी मिरवणुकीला विरोध केला, त्यानंतर हाणामारी झाली आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

वाहने जाळण्यात आली

एसपी डॉ. बिमल म्हणाले, "घोरथांबा ओपी परिसरात दोन समुदायांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना उघडकीस आली आहे. ही घटना होळीच्या उत्सवादरम्यान घडली. आम्ही दोन्ही समुदायांची ओळख पटवत आहोत, घटनेत सहभागी असलेल्या लोकांचाही शोध घेत आहोत. ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही... काही वाहनांना आगही लावण्यात आली आहे.

" उपविकास आयुक्त स्मिता कुमारी म्हणाल्या, "होळीच्या उत्सवादरम्यान काही समाजकंटकांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, काही समाजकंटकांनी काही वाहनांना आग लावली आहे. घटनेची कारणे शोधण्यासाठी तपास सुरू आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT