हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगट विजयी.  file photo
राष्ट्रीय

Vinesh Phogat | विनेश फोगाट यांनी मैदान मारलं! भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana assembly election) जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) विजयी झाल्या. भाजपचे योगेश बैरागी यांचा ६ हजार १५ मतांनी पराभव केला. विनेश यांना ६५०८० मते मिळाली तर योगेश कुमार यांना ५९०६५ मते मिळाली. कुस्तीपटूंचे आंदोलन आणि ऑलिम्पिक अपात्रतेमुळे चर्चेत आलेल्या विनेश फोगट यांना काँग्रेसने निवडणूक मैदानात उतरवले होते.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana assembly election) सर्वांच्या नजरा जुलाना मतदारसंघाकडे लागल्या होत्या. जुलाना येथे १.८७ लाख मतदार असून त्यापैकी ७० टक्के मते जाट समाजाची आहेत. यावेळी ५ पैकी ४ प्रमुख पक्षांनी जाट उमेदवारांना तिकीट दिले होते. या जागेवरून दोन महिला कुस्तीपटूंमध्येही लढत झाली. काँग्रेसकडून विनेश फोगट (Vinesh Phogat) तर भाजपकडून योगेश बैरागी मैदानात होते. आम आदमी पार्टीनेही WWE महिला कुस्तीपटू कविता दलालवर यांना उमेदवारी दिली होती. INLD-BSP युतीकडून डॉ. सुरेंद्र लाथेर आणि जननायक जनता पक्षाचे (JJP) आमदार अमरजीत सिंह धांडा यांनी निवडणूक लढवली. मात्र विनेश फोगट आणि भाजपचे योगेश बैरागी यांच्यातच थेट लढत झाली. सोशल मीडियावरही या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू होती.

संघर्षाचा आणि सत्याचा विजय : विनेश फोगट

जुलाना येथून विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "संघर्षाचा मार्ग निवडलेल्या प्रत्येक मुलीचा आणि महिलेचा हा लढा आहे. हा संघर्षाचा आणि सत्याचा विजय असून देशाने दिलेले प्रेम आणि विश्वास कायम जपेन," असे विनेश यांनी म्हटले आहे.

गेल्या निवडणुकीत जुलाना मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. पक्षाला केवळ १२ टक्के मते मिळाली होती. या जागेवरून जेजेपीचे अमरजीत धांडा विजयी झाले होते. जेजेपीचे अमरजीत धांडा यांना ६१,९४२ मते मिळाली होती. भाजपचे परमिंदर सिंग धुल यांना ३७,७४९ मते तर काँग्रेसचे धर्मेंद्र सिंह धुल्ल यांना केवळ १२,४४० मते मिळाली होती. यावेळी विनेश फोगटची (Vinesh Phogat) कामगिरी काँग्रेससाठी महत्त्वाची ठरली. विनेशच्या विजयामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT