Vande Mataram Lok Sabha Discussion
१९३७ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने (स्वातंत्र्यापूर्वी) वंदे मातरमविरुद्ध मोहीम राबवली. परंतु काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विरोध करण्याऐवजी वंदे मातरमची चौकशी सुरू केली. ते मुस्लिम लीगसमोर शरण गेले. नेहरूंनी दावा केला की, वंदे मातरम मुस्लिमांच्या भावना भडकावू शकते. आपल्या पुढच्या पिढ्यांना हे कोणी केले हे सांगणे आपले कर्तव्य आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंवर हल्लाबोल केला.
वंदे मातरम राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असताना संसदेने दोन्ही सभागृहांमध्ये विशेष चर्चेसाठी १० तास राखून ठेवले आहेत. आज लोकसभेत वंदे मातरमवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्या पुढच्या पिढ्यांना हे कोणी केले हे सांगणे आपले कर्तव्य आहे. काही शक्तींनी गेल्या शतकात राष्ट्रगीताचा विश्वासघात केला. १९३७ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने (स्वातंत्र्यापूर्वी) वंदे मातरमविरुद्ध मोहीम राबवली. परंतु काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विरोध करण्याऐवजी वंदे मातरमची चौकशी सुरू केली.”
"जीनांनी वंदे मातरमला विरोध केल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांना एक पत्र लिहिले होते, यामध्ये त्यांनी म्हटले होते की, मी वंदे मातरमची पार्श्वभूमी वाचली आहे. ते वंदे मातरम मुस्लिमांच्या भावना भडकावू शकते . ते वंदे मातरमचा वापर तपासतील. "
" जेव्हा वंदे मातरमला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता. वंदे मातरमला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा भारत आणीबाणीच्या तावडीत होता. त्यावेळी देशभक्तांना तुरुंगात टाकण्यात आले होते. जेव्हा आपल्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे हे गीत, दुर्दैवाने, भारत एका काळ्या काळाचा साक्षीदार होता. वंदे मातरमची १५० वर्षे ही आपल्या भूतकाळातील ती अभिमानाची आणि त्या महान भागाची पुनर्स्थापना करण्याची संधी आहे. या गीताने आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा दिली, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.