Valmiki Corporation scam
काँग्रेस नेते बी नागेंद्रना ईडीने ताब्यात घेतले Pudhari Photo
राष्ट्रीय

Valmiki Corporation scam : काँग्रेस नेते बी नागेंद्रना ईडीने ताब्यात घेतले

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  वाल्मिकी कॉर्पोरेशन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बी नागेंद्र यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (दि.१२) ताब्यात घेतले आहे. Valmiki Corporation scam

मी निर्दोष बाहेर येऊ

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (दि.१२) कथित वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मंत्री बी नागेंद्र यांना ताब्यात घेतले आहे. बी नागेंद्र यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत त्यांनी म्हटले आहे, " चौकशीनंतर आपण निर्दोष बाहेर येऊ"

सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा

गुरुवारी (दि.११) केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

शोभा करंदलाजे म्हणाल्या, 3 जुलै रोजी मी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सीबीआयचा तपास सुरू असताना कर्नाटक सरकारने हा घोटाळा लपवण्यासाठी एसआयटी स्थापन केली. आता एसआयटी मदत करत नाही. सीबीआयने तपास सुरू केला असून, हैदराबाद, बेंगळुरू आणि बेल्लारी येथे छापे टाकले जात आहेत, त्यामुळे आम्ही सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत चौकशी केली तरच न्याय मिळेल."

SCROLL FOR NEXT