पुढारी ऑनलाईन डेस्क: मंकीपॉक्स निदान करण्यासाठी (डिटेक्शन) भारतात RT-PCR किट विकसित करण्यात आले आहे. या कीटच्या उत्पादनाला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून (CDSCO) मंजुरी मिळाली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकी पॉक्समुळे आंतरराष्ट्रीय चिंतेची दुसरी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. या विषाणूचा नवीन स्ट्रेन (क्लॅड-1) अधिक संक्रमणक्षम मानला जातो आणि त्याचा मृत्यू दर जास्त आहे. दरम्यान भारताने मंकीपॉक्सविरुद्ध (Mpox) लढण्यासाठी स्वतःचे स्वदेशी RT-PCR चाचणी किट विकसित केले आहे, ज्याला केंद्रीय औषध नियमन संस्थेने मान्यता दिली आहे.
IMDX मंकीपॉक्स डिटेक्शन RT-PCR Assay ची निर्मिती वडोदरा येथील आण्विक निदान उत्पादन युनिटमध्ये केली जाईल, ज्याची उत्पादन क्षमता प्रतिवर्ष 1 दशलक्ष प्रतिक्रियांची आहे. किट्स उपलब्ध करून देण्यासाठी कारखाना पूर्णपणे सज्ज आहे," असे Siemens Healthcare Private Ltd ने सांगितले आहे.
"आयएमडीएक्स मंकीपॉक्स डिटेक्शन आरटी-पीसीआर परख ही एक महत्त्वाची निदान चाचणी आहे. जी व्हायरल जीनोममधील दोन वेगळ्या क्षेत्रांना लक्ष्य करते, ज्यामध्ये व्हायरसचे क्लेड I आणि क्लेड II दोन्ही प्रकार आहेत. यामुळे विविध व्हायरल स्ट्रेनची काटेकोर तपासणी केली जाते, असे देखील कंपनीने म्हटले आहे.