Vaishno Devi Yatra file photo
राष्ट्रीय

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवी यात्रेसाठी प्रचंड गर्दी; नोंदणी केंद्रे वेळेआधीच बंद; अ‍ॅडव्हान्स बुकिंग नसेल तर काय करावे?

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची सुचना आहे. कटरा ते वैष्णोदेवी भवन या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी असून अनेक सेवा पुढील दोन आठवड्यांसाठी आधीच बुक झाल्या आहेत.

मोहन कारंडे

Vaishno Devi Yatra

कटरा: शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्ट्यांमुळे सध्या माता वैष्णोदेवी यात्रेला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कटरा ते वैष्णोदेवी भवन या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी असून अनेक सेवा पुढील दोन आठवड्यांसाठी आधीच बुक झाल्या आहेत. वाढत्या गर्दीमुळे नोंदणी केंद्रे नियोजित वेळेपूर्वीच बंद करावी लागत असल्याने भाविकांनी ऑनलाइन अ‍ॅडव्हान्स बुकिंग करूनच यात्रेचे नियोजन करावे.

गैरसोय टाळण्यासाठी, 'श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड' आपल्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे यात्रा स्लिप, निवास व्यवस्था, हेलिकॉप्टर सेवा, बॅटरी कार सेवा, रोप-वे आणि घोडे, हमाल व पालखी सेवांचे अॅडव्हान्स बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.

गेल्या आठवड्यात ३ लाख भाविकांनी दिली भेट

भाविकांना कटरा, यात्रा मार्ग किंवा प्रत्यक्ष भवनावर जास्त वेळ थांबण्याची परवानगी दिली जात नाही; श्राइन बोर्डाचे अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. केवळ गेल्या आठवड्यातच ३ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. यात्रा स्लिप मिळवण्यापासून ते भवन परिसरातील प्रत्यक्ष दर्शनापर्यंत सर्वत्र लांबच लांब रांगा दिसत आहेत. दररोज ४३ ते ५० हजार भाविक कटरा येथे येत आहेत. गर्दीमुळे मुख्य नोंदणी केंद्र बंद झाल्यास, ज्या भाविकांकडे ऑनलाइन यात्रा स्लिप्स आहेत, ते 'दर्शनी ड्योढी' आणि 'तारकोट मार्गा'च्या प्रवेशद्वारावरील नोंदणी केंद्रांवरून त्यांचे आरएफआयडी कार्ड घेऊ शकतात. ६ जून रोजी, यात्रा नोंदणी केंद्र नियोजित वेळेपेक्षा दोन तास आधी (रात्री १० ऐवजी ८ वाजता) बंद करावे लागले होते. त्याचप्रमाणे, रविवारी सर्व नोंदणी केंद्रे सायंकाळी ६:४५ वाजताच बंद केली होती.

दररोज ५० हजार भाविकांनाच परवानगी

प्रचंड गर्दीचा परिणाम हेलिकॉप्टर सेवा, बॅटरी कार, भवन ते भैरव घाटीला जोडणारी केबल कार आणि निवास व्यवस्था यांसारख्या सेवांवरही दिसून येत आहे. श्राइन बोर्डाच्या म्हणण्यानुसार, दररोज केवळ ५० हजार भाविकांनाच यात्रा करण्याची परवानगी दिली जाते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी नोंदणी केंद्रे लवकर बंद केली जात आहेत.

हेलिकॉप्टर, रोपवे आणि निवासाची बुकिंग फुल

हेलिकॉप्टर सेवा, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, रोप-वे सेवा आणि भवन परिसरातील निवास व्यवस्था यांसारख्या बहुतांश ऑनलाइन सेवांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. वृद्ध, दिव्यांग व्यक्ती आणि गंभीर आजारी रुग्णांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT