Unnatural Sex Verdict
पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्याबद्दल पतीला दोषी ठरवता येणार नाही, असा निकाल उत्तराखंड न्यायालयाने दिलेला आहे. File
राष्ट्रीय

Unnatural Sex |पत्नीशी अनैसर्गिक संबंध; पतीला दोषी ठरवता येणार नाही - उच्च न्यायालय

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्याबद्दल पतीला दोषी ठरवता येणार नाही, असा निकाल उत्तराखंड न्यायालयाने दिलेला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ आणि कलम ३७७मधील तरतुदींसंदर्भात ही सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती रवींद्र मैथानी यांनी हा निकाल दिलेला आहे. Unnatural Sex

विवाहात सहमती गृहित धरलेली असते

पती आणि पत्नी यांच्यातील लैंगिक संबंध कलम ३७५ नुसार गुन्हा ठरवण्यात आलेले नाहीत, त्यामुळे पत्नीशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याने कलम ३७७ नुसार पतीला गुन्हेगार ठरवता येणार नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे. कलम ३७५ मध्ये क्रमांक २चा अपवाद करण्यात आलेला आहे, यानुसार पती आणि पत्नी यांच्यातील संबंध बलात्कार मानले जात नाहीत, याचाच अर्थ विवाहित जोडप्यात सहमती ही गृहित धरलेली असते.

Unnatural Sex | कलम ३७७ पतीविरोधात लागू होणार नाही

या सुनावणीत न्यायमूर्ती नवतेज सिंग जोहर विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा दाखला देण्यात आला. "हा खटला कलम ३७५नुसार सुरू आहे, पण या कलमातील अपवाद क्रमांक २ चा विचार केला तर केला तर कलम ३७५नुसार नवऱ्याला दोषी धरता येणार नाही. या परिस्थितीमध्ये कलम ३७७च्या तरतुदी लागू होणार नाहीत." न्यायालयाने हा निकाल देताना नवऱ्याविरोधातील समन्स रद्द केले आहे. ही बातमी बार अँड बेंचने दिलेली आहे.

खटला काय आहे?

या प्रकरणात पत्नीने नवऱ्याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून सत्र न्यायालयाने समन्स बजावले होते. पत्नीची तक्रार अशी होती की नवरा तिच्या मर्जीविरोधात अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवतो, त्यामुळे तिला वारंवार इजा झालेली आहे. अशी इजा, दुखापत होऊनही नवरा वारंवार संबंध ठेवण्यास भाग पाडतो.

नवऱ्याची बाजू काय आहे?

जर दोन प्रौढ व्यक्तींनी खासगीत असे संबंध ठेवले तर तो गुन्हा होत नाही. जर दोन प्रौढ व्यक्ती विवाहित असतील, त्यांच्यात लैंगिक संबंधासाठीची सहमती ही गृहित धरलेली असते आणि प्रत्येक संबंधावेळी अशी सहमती घेण्याची गरज नाही, अशी बाजू नवऱ्याच्या वकिलांनी मांडली. (Unnatural Sex)

Unnatural Sex पत्नीची बाजू काय होती?

अनैसर्गिक संबंधासाठी कोणतीही बायको सहमती देणार नाही, तसेच अशी सहमती वैवाहिक संबंधातही असत नाही. तसेच कलम ३७७ नुसार अनैसर्गिक संबंध हा गुन्हा ठरवण्यात आले आहेत, त्यात पतीला अपवाद केलेले नाही, शिवाय हिंदू विवाह कायदा १९५५मधील कलम १३(२)(II)नुसार अनैसर्गिक संबंध हे घटस्फोटांचेही कारण ठरते, अशी बाजू पत्नीच्या वकिलांनी मांडली

कलम ३७५ आणि कलम ३७७

भारतीय दंड संहितेतील कलम ३७५ बलात्काराची व्याख्या करते. तर कलम ३७७ स्त्री, पुरुष किंवा प्राणी यांच्यासोबतच्या अनैसर्गिक संबंधाची व्याख्या करते. भारतात कलम ३७७ नुसार अनैसर्गिक संबंध गुन्हा आहे.

SCROLL FOR NEXT