पुढारी ऑनलाईन डेस्क: पाऊरी येथे झालेल्या एका बस अपघातात ४ लोक ठार तर १८ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. उत्तराखंडच्या पाउरी जिल्ह्यातील दहालचोरी येथे ही घटना घडली. १०० मिटर खोल दरीत ही बस कोसळली.
राज्य आपत्ती दलाने याबाबत माहिती दिली असून या बसमध्ये २२ प्रवासी होते असे त्यांनी सांगितले. पाऊरी ते दहालचोरी या दरम्यान ही बस प्रवास करत होती. आपत्ती दल व पोलिसांनी मदतकार्य सुरु केले आहे. जखमी १८ जणांना रुग्णालयात दाखल केले असून ४ जण जागीच ठार झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे.