how to set up old phone as CCTV camera file photo
राष्ट्रीय

Smartphone as security camera: जुना फोन फेकू नका! फक्त ५ मिनिटात त्याला बनवा घरगुती सुरक्षा कॅमेरा! CCTV कॅमेरा कसा बनवायचा?

how to set up old phone as CCTV camera: एक जुना फोन, त्याचे इन-बिल्ट कॅमेरे आणि एक साधे ॲप वापरून तुम्ही घरगुती सुरक्षा कॅमेरा प्रणाली तयार करू शकता. जुना फोन सुरक्षा कॅमेरा कसा बनवायचा? जाणून घ्या सेटअप कसा करायचा?

मोहन कारंडे

how to set up old phone as CCTV camera

नवी दिल्ली : आपण सगळेच नवीन तंत्रज्ञान आणि फिचर्ससाठी जुन्या स्मार्टफोनला 'टाटा' करतो. अनेकदा आपले जुने फोन व्यवस्थित काम करत असले तरी ते घरात पडून राहतात. या जुन्या फोनला कचऱ्यात टाकण्याऐवजी, त्याचा एक अत्यंत उपयुक्त असा पुनर्वापर करता येतो, तो म्हणजे घरगुती सुरक्षा कॅमेरा!

एक जुना फोन, त्याचे इन-बिल्ट कॅमेरे आणि एक साधे ॲप वापरून तुम्ही तुमच्या घरासाठी एक प्रभावी आणि स्वस्त सुरक्षा प्रणाली उभी करू शकता. घरात नसतानाही घराचे निरीक्षण करणे, लहान मुलांवर लक्ष ठेवणे किंवा पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आता अगदी सोपे झाले आहे.

जुना फोन सुरक्षा कॅमेरा कसा बनवायचा?

तुमच्या जुन्या फोनला सुरक्षा कॅमेऱ्यात बदलण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि खिशाला परवडणारी आहे. यासाठी फक्त या सोप्या टीप्स फॉलो करा:

१. आवश्यक डिव्हाइसेसची तयारी

तुम्हाला दोन मोबाईल डिव्हाइसची गरज आहे. तुमचा जुना, नियमित वापरत नसलेला स्मार्टफोन. हा कॅमेरा म्हणून काम करेल. तर तुमचा सध्याचा स्मार्टफोन, ज्याद्वारे तुम्ही लाइव्ह फुटेज पाहू शकाल.

२. सुरक्षा ॲप डाउनलोड करा

दोन्ही डिव्हाइसवर (जुना आणि नवीन फोन) प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून एक सुरक्षा कॅमेरा ॲप (उदा. Alfred, Manything, IP Webcam) डाउनलोड करा.

अनेक चांगल्या ॲप्समध्ये रिमोट स्ट्रीमिंग, मोशन डिटेक्शन आणि टू-वे ऑडिओ कम्युनिकेशन यांसारखी महत्त्वाची फिचर्स उपलब्ध असतात.

३. डिव्हाइसेसची जोडणी

दोन्ही फोनवर ॲप सुरू करा आणि एकाच खात्यासह साइन इन करा. ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

ॲपच्या सूचनांनुसार, जुना फोन 'कॅमेरा' डिव्हाइस म्हणून आणि तुमचा सध्याचा फोन 'व्ह्यूअर' म्हणून सेट करा.

४. कॅमेऱ्याची योग्य जागा निवडा

कॅमेरा डिव्हाइस म्हणजे जुना फोन घराच्या महत्त्वाच्या ठिकाणी ठेवा. कॅमेरा उंच ठिकाणी व्यवस्थित असावा. यामुळे अधिक चांगला आणि विस्तृत परिसर कॅप्चर करता येतो. कॅमेऱ्याला सतत पॉवर आणि वाय-फाय नेटवर्कची रेंज मिळणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास पॉवर बँक किंवा लांब चार्जिंग केबलचा वापर करा.

५. चाचणी आणि निरीक्षण

सर्व सेटअप झाल्यानंतर, तुमच्या व्ह्यूअर डिव्हाइसवर लाइव्ह फीड तपासा. मोशन डिटेक्शनची सेन्सिटिव्हिटी आणि नोटिफिकेशन सेटिंग्ज तुमच्या गरजेनुसार बदला.

एकापेक्षा जास्त कॅमेऱ्यांचा सेटअप

जर तुमच्याकडे अनेक जुने स्मार्टफोन असतील, तर तुम्ही याच पद्धतीने त्यांना एकाच वाय-फाय नेटवर्कवर सेट करू शकता आणि संपूर्ण घरासाठी एक प्रभावी मॉनिटरिंग प्रणाली तयार करू शकता.

'हे' लक्षात ठेवा

अशा प्रकारे, ॲप्स वापरून जुन्या फोनचा मूलभूत सुरक्षा कॅमेरा म्हणून पुनर्वापर करू शकता. मात्र याचे काही तोटे आहेत, जसे की कमी रिझोल्यूशन, बॅटरी टिकून राहण्याची समस्या आणि हवामानापासून संरक्षणाचा अभाव. व्यावसायिक सुरक्षा कॅमेऱ्यांमध्ये एनक्रिप्शन, स्थानिक स्टोरेज आणि विश्वसनीय २४/७ ऑपरेशन यांसारखी अधिक चांगली सुरक्षा फिचर्स मिळतात. ज्यामुळे ते घरगुती निरीक्षणासाठी अधिक सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह ठरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT