तिरुपती : तिरुपती देवस्थानातील प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता, असा गंभीर आरोप केला गेल्यानंतर यावरून आंध्र प्रदेशात चांगलाच वाद पेटला आहे. (Tirupati laddu row) तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूयांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला, तर जगनमोहन रेड्डी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.
मागील पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी देवस्थानचे पावित्र्य घालवले. ‘अन्नदानम’ अर्थात अन्नदानाच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला, असे नायडूंनी म्हटलेे.