अमेरिकन प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. (Image source- X)
राष्ट्रीय

अमेरिका आज ११९ कथित बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत पाठवणार

Illegal Indian Immigrants | रविवारी ६७ जणांची तुकडी येणार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ११९ कथित बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची तुकडी अमृतसरमध्ये येणार आहे. त्यानंतर रविवारी, १६ फेब्रवारी रोजी ६७ लोकांची आणखी एक तुकडी अमेरिका परत पाठवणार आहे. अमेरिकेचे लष्करी विमान १५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता विमानतळावर उतरण्याची अपेक्षा आहे.

११९ जणांपैकी ६७ नागरिक पंजाबमधील, ३३ जण हरियाणातील, ८ जण गुजरातमधील, ३ जण उत्तर प्रदेशातील, प्रत्येकी दोन जण गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील आणि प्रत्येकी एक जण हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारी, १६ फेब्रुवारी रोजी ६७ निर्वासितांचा आणखी एक गट परतण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी, ५ फेब्रुवारी रोजी १०४ कथित बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते.

दरम्यान, भारताने बेकायदेशीर स्थलांतराबद्दल भूमिका मांडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, इतर देशांमध्ये बेकायदेशीरपणे आढळणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला भारत परत घेईल. ते म्हणाले की अशा बेकायदेशीर जाळ्याला लक्ष्य करून त्यांचा नाश करणे आवश्यक आहे. यासाठी पंतप्रधानांनी दोन्ही देशांना एकत्र काम करण्याचे आवाहनही केले.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, भारत आंतरराष्ट्रीय चौकटीनुसार कायदेशीर स्थलांतर आणि स्थलांतर धोरणांना पूर्णपणे पाठिंबा देतो. भारत बेकायदेशीर स्थलांतराला तीव्र विरोध करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT