नवी दिल्ली; पीटीआय : अमेरिकेच्या वित्त विभागाचे मुख्य उच्चपदस्थ अधिकारी भारत दौर्यावर आले असून, उद्या (मंगळवार) उभय देशांमध्ये द्विपक्षीय व्यापाराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफची यामुळे कोंडी फुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दोन्ही देशांत व्यापार कोंडी फोडण्यासाठी अमेरिकेच्या व्यापार विभागाचे मुख्य अधिकारी सोमवारी रात्री भारतात दाखल झाले. दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेची नवी फेरी मंगळवारपासून सुरू होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असताना हा दौरा होत आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी पंतप्रधानांचा ‘प्रिय मित्र’ असा उल्लेख करीत थांबलेल्या व्यापार चर्चेत सकारात्मक घडामोडींचे संकेत होते. पंतप्रधान मोदी यांनीही ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.