'UPSC'चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा  file photo
राष्ट्रीय

'UPSC'चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा; कार्यकाळ संपण्यापूर्वीच सोडले पद

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष मनोज सोनी (Manoj Soni) यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिला आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारला जाईल की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

मनोज सोनी (Manoj Soni) यांनी वैयक्तिक कारणांमुळे राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवल्याचे सांगितले जाते. २०१७ मध्ये ते आयोगाचे सदस्य झाले, त्यानंतर १६ मे २०२३ रोजी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. २०२९ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र पाच वर्ष आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

कोण आहेत मनोज सोनी?

मनोज सोनी (Manoj Soni) यांना आता आपला अधिक वेळ गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा अनुपम मिशनला घालवायचा आहे, या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. २०२० मध्ये दीक्षा घेतल्यानंतर ते अनुपम मिशनमध्ये निष्काम कर्मयोगी बनले. मनोज सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. २००५ मध्ये जेव्हा ते ४० वर्षांचे होते, तेव्हा मोदींनी त्यांना वडोदरा येथील प्रसिद्ध एमएस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त केले होते. तेव्हा देशातील सर्वात तरुण कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT