नवी दिल्ली : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (यूपीआय) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (एनपीसीएल) ने ऑगस्ट 2025 मध्ये तब्बल 20 अब्ज व्यवहारांचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. जुलै महिन्यातील 19.47 अब्ज व्यवहारांच्या तुलनेत ही एक लक्षणीय वाढ आहे.
ऑगस्ट 2025 मधील व्यवहारांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 34 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मूल्यामध्येही प्रभावी कामगिरी दर्शवली आहे.
दैनंदिन व्यवहार : ऑगस्ट महिन्यात दररोज सरासरी 64.5 कोटी (645 दशलक्ष) व्यवहार झाले, ज्यांचे सरासरी दैनंदिन मूल्य 80,177 कोटी होते.
या महिन्यात एकूण 24.85 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. हे मूल्य जुलै महिन्यातील 25.08 लाख कोटींपेक्षा कमी असले तरी, मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत त्यात 21% वार्षिक वाढ झाली.
केंद्र सरकारने यूपीआयद्वारे दररोज 100 कोटी (1 अब्ज) व्यवहारांचे लक्ष्य ठेवले आहे आणि सध्याच्या वाढीचा दर पाहता, हे लक्ष्य पुढील वर्षापर्यंत गाठले जाण्याची शक्यता आहे.