राष्ट्रीय

UPI Burj Khalifa Dubai : ‘बुर्ज खलिफा’च्या ऑनलाईन बुकिंगसाठी चालणार ‘यूपीआय’

भारतीय पर्यटकांना प्रवासापूर्वीच तिकिटांची खरेदी करणे शक्य होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंटस्‌ लिमिटेड (एनआयपीएल) ने संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील नीओपे आणि एमार एंटरटेनमेंट यांच्या भागीदारीत ‘ॲट द टॉप, बुर्ज खलिफा’च्या अधिकृत वेबसाईटवर युनिफाईड पेमेंटस्‌ इंटरफेस (यूपीआय) द्वारे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता भारतीय पर्यटक तिकिटे ऑनलाईन बूक करण्यासाठी ‘यूपीआय’चा वापर करू शकतील.

या उपक्रमामुळे यूएईमध्ये केवळ दुकानांमधील क्यूआर कोड पेमेंटपुरता मर्यादित असलेला यूपीआयचा वापर आता ऑनलाईन प्रवास बुकिंगपर्यंत विस्तारला आहे. ज्यामुळे भारतीय पर्यटकांना प्रवासापूर्वीच तिकिटांची खरेदी करणे शक्य होणार आहे.

तसेच, भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीचा जागतिकस्तरावर स्वीकार वाढवण्याच्या आणि भारतीय पर्यकांसाठी सीमापार पेमेंटचे पर्याय अधिक सक्षम करण्याच्या ‘एनपीसीआय इंटरनॅशनल’च्या प्रयत्नांचे हे यश आहे. या निर्णयामुळे, दुबईतील हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ ई-कॉमर्स व्यवहारांसाठी यूपीआयचा स्वीकार करणारे यूएईमधील पहिलेच स्थळ ठरले आहे.

‘एनआयपीएल’ हे नॅशनल पेमेंटस्‌ कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एनपीसीआय) उपकंपनी असून, ‘एनआयपीएल’ २०२२ पासून नीओपेसोबत क्यूआर कोडआधारित यूपीआय पेमेंटवर काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT