विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला हाेता. File Photo
राष्ट्रीय

विनेश फोगाटने दाखल केला उमेदवारी अर्ज

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जुलाना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.११) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस खासदार दीपेंद्र एस हुडा उपस्‍थित होते.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांनी ६ सप्टेंबरला काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला हाेता. यावेळी विनेश फोगाट म्‍हणाली की, "लढा सुरूच आहे, तो अजून संपलेला नाही. तो न्‍यायालयात आहे. आम्ही तो लढाही जिंकू. आज जे नवीन व्यासपीठ मिळत आहे, त्यासोबत आम्ही काम करू. देशाच्या सेवेसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी आमचे सर्वोत्तम कार्य करू, जर तुमच्यासाठी कोणी नसेल तर मी तिथे असेल, काँग्रेस पक्ष असेल."

केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणूक कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासोबत हरियाणामध्ये १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार होते आणि ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांतील निकाल जाहीर होणार होता. मात्र, हरियाणामध्ये आता ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT