death  Pudhari
राष्ट्रीय

Crime News: मित्रांची जीवघेणी चेष्टा! शरीरात एअर प्रेशर पाईपने हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू

एका कंपनीत काम करणाऱ्या काशीपूर येथील तरुणाचा त्याच्याच सहकाऱ्यांच्या अघोरी चेष्टेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Crime News

काशीपूर: उत्तर प्रदेशातील यमुना सिटी परिसरात एका कंपनीत काम करणाऱ्या काशीपूर येथील तरुणाचा त्याच्याच सहकाऱ्यांच्या अघोरी चेष्टेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एअर प्रेशर पाईपद्वारे शरीरात हवा भरल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोटात हवा भरल्याने आतडे फाटले

मिळालेल्या माहितीनुसार, यमुना सिटी येथील सेक्टर-२९ मधील 'सूर्या ग्लोबल फ्लेक्सी फिल्म' कंपनीत समीर नावाचा तरुण सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. १६ जून रोजी तो आपले सहकारी दिलशाद आणि जीशान यांच्यासोबत काम करत होता. काम सुरू असतानाच दोन्ही मित्रांनी समीरसोबत एक भयानक चेष्टा केली. त्यांनी समीरच्या गुदद्वारात थेट एअर प्रेशर पाईप लावून हवा सोडली.

एअर प्रेशरमुळे समीरच्या शरीरात प्रचंड वेगाने हवा शिरली, ज्यामुळे तो वेदनेने विव्हळू लागला आणि त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. अति दाबामुळे त्याचे आतडे फाटले होते. त्याला तातडीने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

चार बहिणींचा एकुलता एक भाऊ

समीरला चार बहिणी आहेत. त्याच्या कमाईवर कुटुंब चालत होते. त्याच्या अशा अचानक आणि धक्कादायक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक धर्मेंद्र सिंह यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपी मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT