उत्तर प्रदेशमधील बदायु जिल्हयातील एका गावातून अनोखी बाब समोर आली आहे. यावेळी एका खाजगी कार्यक्रमात जेवण जेवल्यानंतर 200 जणांना चक्क ॲन्टी रेबिजचे इंजेक्शनAnti-Rabies Vaccine घ्यावे लागले आहे. याला कारणही तसेच घडले आहे. एक पिसाळलेला कुत्रा एका म्हशीला चावला त्यामुळे त्या म्हशीला रेबिज झाला व त्यात ती म्हैस दगावली. 27 डिसेंबर रोजी ही घटना उघडकीस आली.
का घ्यावे लागले ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन
म्हैस रेबिज झाल्यामुळे दगावली पण त्या म्हशीच्या दुधापासून तयार केलेले ताक, मठ्ठा अनेकजन प्यायले. कारण या खाजगी कार्यक्रमात जेवणाचा बेत ठेवला होता त्यात ताक, दही, रायता याचाही समावेश होता. व हे ताक तयार करण्यासाठी जे दूध वापरले होते त्यामध्ये रेबिजने मेलेल्या म्हैसीचेही दूध मिसळले गेले होते. ही गोष्ट ज्यावेळी समोर आली त्योवळी अनेकांच्या पोटात गोळा आला. खबरदारी म्हणून ज्यांनी ज्यांनी या ताक, मठ्ठा रायत्याचे सेवन केले आहे त्यांना ॲन्टी रेबीज इंजेक्शन देण्यात आली.
रेबिजवर उपाय नाही त्यामुळे खबरदारी
एकदा रेबिज झाला की कोणताही इलाज चालत नाही यामुळे यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने ज्यांनी मठ्ठा प्यायला आहे त्यांना ॲन्टीरेबिज इंजेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक महिला पूरुष लाईन लावून हे इंजेक्शन घेत होते. बदायूचे चिफ मेडीकल ऑफिसर डॉ. रामेश्वर मिश्रा यांनी सांगितले की हे इंजेक्शन दिल्याने कोणताही धोका नाही पण चूकून रेबिज झालाच तर मात्र जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी हे इंजेक्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान कौशल कुमार या स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गावातील एका म्हशीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. म्हशीच्या मालकाला सुरुवातीला याची कल्पना नव्हती. दरम्यान, त्या म्हशीचे दूध गावातील अनेक घरांमध्ये आणि काही पाहुण्यांनाही देण्यात आले. काही दिवसांनी म्हशीमध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागली आणि तिचा मृत्यू झाला. जेव्हा ही बाब आरोग्य विभागाला समजली, तेव्हा त्यांनी तातडीने तपासणी सुरू केली. प्राथमिक चौकशीत समोर आले की, गावातील जवळपास २०० लोकांनी या बाधित म्हशीच्या दूधापासून तयार झालेला मठ्ठा प्यायले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांच्या पथकाने गावात धाव घेतली. या दूधाच्या पदार्थांचे सेवन केलेल्या प्रत्येक व्यक्तीची यादी तयार करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांना अँटी-रेबीज व्हॅक्सीन (ARV) देण्यात आले आहे.