उत्तरप्रदेशातील एटा शहरातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. माणूसकी कशी हरवत चालली आहे. याचे उदाहरण यातून दिसून येते. एका आठ वर्षाच्या मुलाला आपल्या जन्मादात्या आईचे शव घेऊन रुग्णालयात पोस्ट मार्टेमसाठी जावे लागले. या मातेचा मृत्यू एचआयव्ही मुळे झाला होता त्यामुळे त्याच्या संबधित नातेवाईकांना त्यांच्या घराकडे पाठ फिरवली. यामुळे त्या मुलावरअसा प्रसंग उद्भवला.
या मुलांच्या वडीलांचे यापुर्वी एचआयव्हीमुळेच गेल्या वर्षी निधन झाले आहे. त्यानंतर त्या मुलाची आईही या आजाराशी लढत होती. शेवटी काल तिचे निधन झाले. यानंतर तिच्या संबधित नातेवाईकांनी त्यांची मदत केली नाही. त्यामुळे मुलालाच आईचे शव पोस्टमार्टेमसाठी घेऊन जावे लागले. आता एटा मधील पोलिस ठाण्याचे प्रभारी यांनी या महिलेच्या अंतिम संस्काराची जबाबदारी घेतली आहे.
मुलाने याबाबत सांगितले की ज्यावेळी नातेवाईकांना आईच्या आजाराविषयी कळाले त्यावेळी त्यांनी आजाराच्या भीतीमुळे नातेवाईक त्यांच्या आईपासून दूर गेले. त्याने एकट्याने फर्रुखाबाद, कानपूर आणि दिल्ली येथे त्याच्या आईच्या उपचारांची व्यवस्था केली. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर, जेव्हा शवविच्छेदन आणि अंत्यसंस्काराचा प्रश्न आला तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह खांद्यावर घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्याचे काका आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी मृतदेहाला स्पर्शही करण्यास नकार दिला.
यानंतर त्या मुलाने एकट्यानेच आईचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. तेथे, त्याने स्वतः शवविच्छेदनाची औपचारिकता पूर्ण केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून, जयथरा पोलिस स्टेशनचे अधिकारी रितेश ठाकूर यांनी अंत्यसस्कांराची जबादारी घेतली. मुलगा एकटा पडू नये यासाठी त्याला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे.