केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू  File Photo
राष्ट्रीय

'वक्फ' विधेयक मुस्लिमांविरोधात असल्‍याची काहींकडून दिशाभूल : मंत्री किरेन रिजिजू

'वक्फ'च्‍या मालमत्तेशी कोणीही छेडछाड करू शकत नाही

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आज भारतात अनेक मुस्‍लिम कुटुंब श्रीमंत नाहीत. वक्‍फ मालमत्तेचा लाभ सर्वांना मिळाला पहिजे. काही लोक दिशाभूल करत आहेत की, वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे. पण, तसे नाही. आपल्‍या देश कायदा, संविधान आणि व्यवस्थेवर चालतो. सरकार किंवा कोणतीही व्यक्ती वक्फ मालमत्तेशी छेडछाडक करू शकत नाही, असे अल्‍पसंख्‍यांक व्‍यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज (दि.१५) माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

जम्‍मू-काश्‍मीर दौर्‍यावर असलेले रिजिजू म्‍हणाले की, "जगात सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात आहेत. देशात अनेक मुस्लिम कुटुंब श्रीमंत नाहीत. त्‍यांनाही वक्फ मालमत्तेचा लाभ मिळाला पाहिजे, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे, असे काही लोक दिशाभूल करत आहेत. आपला देश कायदा, संविधान आणि व्यवस्थेवर चालतो. सरकार किंवा कोणतीही व्यक्ती वक्फ मालमत्तेबरोबर हस्‍तक्षेप करु शकत नाही."

सूफी तीर्थक्षेत्रे प्रेमाचा संदेश देतात...

"श्रीनगरमधील हजरतबल तीर्थक्षेत्र जगभर प्रसिद्ध आहे. जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाने हजरतबल तीर्थक्षेत्राचे नूतनीकरण करण्यासाठी घेतलेल्‍या निर्णयाचा मला खूप आनंद आहे. राज्यांच्या वक्फ बोर्डाला पाठिंबा देणे ही माझी जबाबदारी आहे आम्ही जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाला पाठिंबा देऊ. सूफी तीर्थक्षेत्रे प्रेमाचा संदेश देतात. आम्ही अशा आणखी स्थळांचा विकास करू, असेही रिजिजू यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT