‘मंकीपॉक्स’ या विषाणूजन्य संसर्गाचा जगात वेगाने फैलाव होत आहे.  Pudhari File Photo
राष्ट्रीय

‘mpox’च्या एंट्रीनंतर आरोग्य मंत्रालय अलर्टवर, राज्यांना ॲडव्हाजरी जारी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘मंकीपॉक्स’ या विषाणूजन्य संसर्गाचा जगात वेगाने फैलाव होण्याचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ऑगस्टमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. भारतात याचा एक संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर mpox च्या प्रकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Union Health Ministry) सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवीन ॲडव्हाजरी (mpox advisory) जारी केली.

‘मंकीपॉक्स’बाबत राज्यांना सतर्कतेचा सल्ला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ॲडव्हाजरीतून, काही देशांत मंकीपॉक्सचा (mpox cases) उद्रेका झाला असला तरी भारतात एकही रुण आढळून आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही राज्य सरकारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच देखरेख ठेवण्यासाठीच्या मंत्रालयाच्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे आणि या संसर्गाचा संशयित आणि बाधित प्रकरणांचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांना हाताळण्यासाठी विलगीकरण सुविधा स्थापन करावी, असे सूचित केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने पुढे नमूद केले आहे की राष्ट्रीय एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (आयडीएसपी) देशातील कोणत्याही एमपॉक्स क्लस्टरची ओळख पटवण्यासाठी सक्रियपणे निरीक्षण करत आहे. विमानतळांवर येणाऱ्या प्रवेशांची आरोग्य तपासणी वाढवण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अंतर्गत प्रयोगशाळेचे नेटवर्क संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी मजबूत करण्यात आले आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष द्यायला हवे

राज्यांनी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांकडे विशेष लक्ष द्यायला हवे. विशेषत: त्वचा आणि गुप्तरोग (sexually transmitted diseases) उपचार क्लिनिकनी mpox ची सामान्य लक्षणे आणि निदानानंतर कराव्या लागणाऱ्या उपचाराबद्दल जागरुक राहण्याची गरज असल्याचे ॲडव्हाजरीमध्ये नमूद केले आहे.

लोकांमध्ये भीती पसरू नका- Health Ministry

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेद्वारे (NACO) निश्चित केलेली देखरेख ठिकाणे ते त्यांच्या कार्यक्षेत्र ठिकाणांपर्यंत समुदायातील सर्व संशयित प्रकरणांची स्क्रीनिंग आणि चाचणी केली जाईल. "सर्व राज्यांनी लोकांमध्ये रोग, त्याच्या प्रसाराचे माध्यम, वेळेवर अहवाल आणि प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता याबद्दल जागृती करण्यासाठी योग्य उपाययोजना हाती घ्यावी. पण यादरम्यान जनतेमध्ये कोणतीही भीती निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी." असे ॲडव्हाजरीमध्ये म्हटले आहे.

mpox चा एक संशयित प्रकरण आढळला

देशात mpox चा एक संशयित प्रकरण आढळून आला असल्याची माहिती रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनातून दिली होती. “एक तरुण पुरुष रुग्णाने हल्लीच एमपॉक्सचा उद्रेक झालेल्या देशातून प्रवास केला होता. त्याला एमपॉक्सचा संशयित रुग्ण म्हणून ओळखले गेले आहे,” असे मंत्रालयाने सांगितले आहे. सदर रुग्णाला वेगळे ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे मंत्रालयाने पुढे म्हटले आहे.

 mpox ची लक्षणे काय?

  • Mpox जवळच्या संपर्कातून पसरू शकतो.

  • सामान्यतः तो सौम्य असतो, पण दुर्मिळ प्रकरणांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो.

  • फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात.

  • शरीरावर पुरळ उठतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT