पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूरमधील हेन्नूर परिसरात बांधकाम सुरु असणारी सात मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत पाज जण ठार झाले आहेत. इमारत कोसळली तेव्हा बांधकाळस्थळी २१ कामगार होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
सात मजली इमारत कोसळल्याचा क्षण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. या इमारतीला केवळ चार मजल्यांची परवानगी असून, बांधकामाचे उल्लंघन झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बुधवारी सकाळी बचावकार्यात डॉग स्वाडच्या मदतीने घेण्यात आली. जखमींपैकी चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या दुर्घटनेबाबत माहिती देताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले की, ही इमारत बेकायदेशीरपणे बांधली जात होती. दुर्घटना झाली तेव्हा २१ कामगार बांधकाम स्थळी होते. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात बांधकाम सुरू असलेल्या सर्वच इमारतींची पाहणी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात येणार असल्याचेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत बंगळूरु जिल्ह्यातील ग्रामीण भागात १७६ मिमी तर शहरी भागात १५७ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद आहे. विमानतळांवर पाणी साचल्याने अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आजही कर्नाटकच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.