राष्ट्रीय

महाराष्ट्रात मविआचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडेच ?

दिनेश चोरगे

[author title="प्रशांत वाघाये" image="http://"][/author]

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या नावाखालीच लढविली जाणार असून उद्धव ठाकरे हेच आघाडीचे नेतृत्व करतील, असा संदेश काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिला आहे. सध्या होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी होईल, अशी विधाने करू नका, असा सबुरीचा सल्लाही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानपरिषद निवडणुकीत जागा वाटपावरून बोलणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नव्हता, असे विधान नाना पटोले यांनी केले होते. त्यानंतर शिवसेनेनेही त्यावर प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे काॅंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मतभेद असल्याचे दिसून आले होते.

मात्र, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा केली. त्यानंतर खर्गे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या चर्चेची माहिती दिली. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारून विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, अशा सूचना खर्गे यांनी पटोले यांना दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT