Gang Rape Case pudhari photo
राष्ट्रीय

Gang Rape Case: धक्कादायक आफ्टर पार्टी! कंपनीच्या CEO सह तिघांनी तिला गाडीत घेतलं, स्मोक दिला.. महिला मॅनजर सकाळी शुद्धीत आली अन्...

Gang Rape Case: धक्कादायक आफ्टर पार्टी! कंपनीच्या CEO सह तिघांनी महिला मॅनजरला गाडीत घेतलं स्मोक खरेदी केलं अन्..

Anirudha Sankpal

After Party Gang Rape Case: आधी हॉटेलमध्ये CEO चा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर केक कापून जल्लोष करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरू होती. त्यातच आफ्टर पार्टीचं आमंत्रणही महिला मॅनेजरला देण्यात आलं. मात्र हीच आफ्टर पार्टी या महिला मॅनजरसाठी आयुष्यातील एक भयानक कहानी ठरली.

पार्टी संपल्यानंतर ज्यावेळी महिला मॅनेजरला घरी सोडण्याची ऑफर ठेवण्यात आली. तिला गाडीत बसवण्यात आलं. या गाडीत कंपनीचा CEO आणि महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती उपस्थित होते. महिला मॅनेजरला सीईओवर विश्वास होता. त्यामुळं ती या गाडीत बसली अन् पुढचा प्रवास सुरू झाला.

दरम्यान, आफ्टर पार्टीच्या नावाखाली रस्त्यातच स्मोक खरेदी करण्यात आला. कारमध्ये सर्वांनी स्मोक केलं. त्यानंतर असं काही घडलं की सर्वचजण दंग झाले. आता महिला मॅनेजरने तिच्यावर गँगरेप केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर या तिघांना न्यायालयासमोर उभं करण्यात आलं. त्यांना चार दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. उदयपूरमधील ही घटना असून याची देशभर चर्चा सुरू आहे.

पीडिता FIR मध्ये काय म्हणते?

दाखल झालेल्या एफआयआरमध्ये, पीडिता एक खासगी कंपनीत मॅनेजर पदावर काम करत होती. २० डिसेंबर रोजी कंपनीच्या सीईओचा वाढदिवस आणि न्यू इयर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन शोभागपुरा येथील एका हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. पीडिता या पार्टीत रात्री ९ वाजेपर्यंत पोहचली होती.

ही पार्टी रात्री १.३० मिनिटांपर्यंत चालली होती. पार्टीचा कार्यक्रम औपचारिकरित्या संपला. पार्टीत कंपनीच्या सीईओसोबत महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिचा पती देखील उपस्थित होते. पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, पार्टीवेळी तिची तब्येत बिघडत होती. ती बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत होती. त्याचवेळी काही लोकांनी तिला घरी सोडण्याची ऑफर देण्याची आली. मात्र महिला एक्झिक्युटिव्ह हेडने जिला ऑफ्टर पार्टीचा प्रस्ताव दिला.

स्मोकिंगची सामुग्री खरेदी केली अन्...

एफआयआरमध्ये नमुद करण्यात आल्याप्रमाणे रात्री जवळपास १.४५ मिनिटांनी पीडित महिलेला गाडीत बसवण्यात आलं. या गाडीत सीईओ आणि महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती आधीपासूनच उपस्थित होते. या तिघांनी तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिलं. रस्त्यात त्यांनी दुकानातून स्मोकिंगची सामुग्री खरेदी केली. पीडित महिलेला देखील स्मोक करण्यासाठी सांगण्यात आलं.

मात्र स्मोकिंगनंतर त्या महिलेची तब्येत जास्तच बिघडली. ती पूर्णपणे बेशुद्ध झाली. काही वेळानं तिला शुद्ध आली त्यावेळी तिने सीईओ तिच्यासोबत असभ्य वर्तन करत होता असा आरोप केला. महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिच्या पतीने मिळून तिच्यासोबत वाईट कृत्य केलं. पीडितेने सांगितल्याप्रमाणे ती स्वतःला वाचवण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी सतत याचना करत होती. मात्र आरोपींनी तिचे ऐकले नाही अन् तिच्यावर बलात्कार केला.

सकाळपर्यंत सुरू होता प्रकार

पीडितेने पोलिसांना सांगितले की, जवळ जवळ पहाटे ५ वाजता तिला तिच्या घरी सोडण्यात आलं. घरी आल्यावर ती पूर्णपणे नॉर्मल नव्हती. ज्यावेळी तिला शुद्ध आली त्यावेळी तिला तिचे एक इयरिंग, सॉक्स आणि अंडरगार्मेंट गायब होता. तिच्या प्रायव्हेट पार्टवर जखम देखील झाली होती. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ती खचली होती. त्यानंतर तिनं हिम्मत करून पोलीस ठाणे गाठले.

गाडीच्या डॅशकॅमने सत्य आलं समोर

या प्रकरणात सर्वात महत्वाचा ठरला तो गाडीमधला डॅशकॅम! पीडित महिला आणि तपास यंत्रणाने कारच्या डॅशकॅमचा ऑडिओ व्हिडिओ फुटेजची तपासणी केली. त्यावेळी एफआयआर नुसार तपासात डॅशकॅममध्ये त्या रात्री काय झालं होतं ते सगळं कैद झालं होतं. फुटेजमध्ये सीईओ, महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिचा पती जे काही करत होते ते सर्व कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तपासात हाच पुरावा महत्वाचा मानला जात आहे.

पोलिसांनी केली कारवाई

सुखेर पोलीस ठाण्यात या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली. पोलिसांनी प्राथमिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तीन आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभं करण्यात आलं. न्यायालयानं देखील आरोपींना चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. पोलीस आता आरोपींची चौकशी करत असून प्रत्येक पैलूची खोलात जाऊन चौकशी करण्यात येत आहे. यात हॉटेलमधील पार्टी, आफ्टर पार्टी, कारचे लोकेशन आणि इतर तांत्रिक पुरावे देखील सामील आहेत.

आफ्टर पार्टी काय असते?

आफ्टर पार्टी हा शब्द या प्रकरणात केंद्रस्थानी आला आहे. सहसा एखाद्या मुख्य कार्यक्रमानंतर जी दुसरी पार्टी आयोजित केली जाते त्याला आफ्टर पार्टी म्हणतात. ही पार्टी अनौपचारिक असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्याच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर, कॉन्सर्टनंतर किंवा कोणत्याही मोठ्या शो नंतर काही खास अन् जवळचे लोकं एकमेकांना आरामात भेटतात. इथं खान-पान, संगीत, हलक्या गप्पा मस्ती होत असते. मात्र या प्रकरणात आफ्टर पार्टीच्या बहाण्यानं पीडित महिलेला अशा परिस्थितीत आणलं गेलं अन् तिच्यासोबत गंभीर कृत्य करण्यात आलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT