राष्ट्रीय

Two Thousand Notes : २४० अब्ज मूल्याच्या नोटांचे करायचे काय? नोटा बदलण्यासाठी उरले ५ दिवस

दिनेश चोरगे

नवी दिल्ली :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 19 मे रोजी दोन हजारची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. या नोटा बँकेत जमा करण्यासाठी अथवा नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुदत संपण्यासाठी अवघे पाच दिवस उरले असल्याने पुढे काय होणार, याबद्दल लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे. (Two Thousand Notes )

3.32 लाख कोटी

एवढ्या मूल्याच्या 93 टक्के नोटा 1 सप्टेंबरअखेर बँकांत जमा झाल्या आहेत.

240 अब्ज

एवढ्या मूल्याच्या नोटा अद्यापही चलनात आहेत. दोन हजारांच्या एकूण मूल्याच्या नोटांपैकी 1 सप्टेंबरअखेर चलनात असलेल्या नोटांचे प्रमाण 7 टक्के आहे. (Two Thousand Notes )

30 सप्टेंबर

30 सप्टेंबर नंतर चलनात असलेल्या 2 हजारांच्या नोटा 1 ऑक्टोबरपासून वैध ठरणार की अवैध, याबाबत संभ्रम आहे. कारण याबाबत आरबीआयने खुलासा केला नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नोव्हेंबर 2016 साली दोन हजारच्या नोटा चलनात आणल्या होत्या. 26, 29 आणि 30 सप्टेंबर या दिवशीच बँका सुरू आहेत. उर्वरित दिवशी बँकांना सुट्टी आहे. (Two Thousand Notes )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT