पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी टोप खोंगनांगखोंग येथून बंदी घातलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या एका सक्रिय सदस्याला अटक करण्यात आली. येंगखोम भोगेन सिंग (वय ५०) असे त्याचे नाव आहे. तसेच बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी (एमएफएल) च्या एका सदस्याला मंत्रीपुखरी बाजार येथून अटक करण्यात आली. पुखरामबम थोइबा सिंग (वय ३८) असे त्याचे नाव आहे.