राष्ट्रीय

बलात्कार करून अल्‍पवयीन मुलीला जिवंत जाळणार्‍या दोघा क्रूरकर्म्यांना फाशीची शिक्षा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तलिा जिवंत जाळल्‍या प्रकरणी दोघा भावांना राजस्‍थानमधील न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

राजस्‍थानमधील  भीलवाडा जिल्‍ह्यातील पीडिता गुरे चरण्‍यासाठी गेली असता बेपत्ता झाली होती. काही तासानंतर गावातील वीटभट्टीत तिच्‍या मृतदेहाचा सांगाडा सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. यानंतर मु मुलीवर बलात्कार करून तलिा जिवंत जाळल्‍याची कबुली नराधम भावांनी दिली होती.

दोघांना फाशी, सात जणांची निर्दोष मुक्तता

या प्रकरणी विशेष सरकारी वकील महावीर सिंग किष्णवत यांनी 'पीटीआय'ला सांगितले की, या प्रकरणातील आरोपी कालू लाल आणि त्याचा भाऊ कान्हा यांना पोक्सो न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले होते. बलात्‍कारानंतर अल्‍पवयीन मुलगी ही भट्टीत टाकण्यापूर्वी जिवंत होती, असे न्यायवैद्यक पुराव्यावरुन स्‍पष्‍ट झाले होते. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यातील अन्य सात आरोपींचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या निर्दोष सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे किष्णवत यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

SCROLL FOR NEXT