मध्यरात्री एका मंदिरात उकरला विवाह
लग्नाचा व्हिडिओ स्वतःच सोशल मीडियावर केला शेअर
सोशल मीडियावर उमटत आहेत संमिश्र प्रतिक्रिया
Two Girls got married to each other video goes viral
सुपौल: बिहारमध्ये सध्या एका लग्नाची चर्चा जोरात सुरु आहे. कारणही तसेच आहे. हे लग्न तरुण आणि तरुणीमधील नसून, दोन तरुणींनी सर्व सामाजिक बंधने झुगारून विवाह केला आहे. एका मंदिरात जाऊन त्यांनी साध्या पद्धतीने लग्न केले. विशेष म्हणजे, मंदिरात अग्नी उपलब्ध नसल्याने त्यांनी गॅस शेगडीभोवतीसात फेरे विवाह उकरला. या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बिहारमधील मधील सुपौल जिल्ह्यात त्रिवेणीगंजमधील दोन तरुणींची ओळख सुमारे दोन वर्षांपूर्वी 'इंस्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली होती. काही दिवसांमध्येच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन्ही तरुणी गेल्या दोन महिन्यांपासून त्रिवेणीगंजमधील वॉर्ड क्रमांक १८ मध्ये भाड्याने खोली घेऊन एकत्र राहत होत्या. त्या दोघी एकाच मॉलमध्ये कामाला होत्या.
दोन्ही तरुणींनी सामाजिक बंधन झुगारुन विवाहाचा निर्णय घेतला. आपल्या लग्नाचा समाज मान्यता देणार नाही याची पूर्वकल्पना असल्याने मध्यरात्रीच गुपचूप विवाह उकरण्यासाठी मंगळवारी (२३ डिसेंबर) मध्यरात्री दोघी त्रिवेणीगंज येथील मेळा मैदानावर असलेल्या एका मंदिरात गेल्या. अग्नीला साक्षी मानून विवाह करायचा होता;पण मंदिरात अग्नी उपलब्ध नव्हता. त्यांनी गॅस शेगडीला साक्षी मानून सात फेरे घेतले.
मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज येथील पूजा गुप्ता आणि शंकरपूर परिसरातील काजल कुमारी गेल्या दोन महिन्यांपासून त्रिवेणीगंजमधील वॉर्ड क्रमांक १८ मध्ये भाड्याने खोली घेऊन एकत्र राहत होत्या. त्यांनी मध्यरात्री गुपचूप लग्न उकरले. त्यानंतर त्यांनी स्वतःच लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. काही काळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर या समलैंगिंक विवाहाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सध्या या विवाहाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली असून, सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.