Srinagar Illegal Property Demolition | श्रीनगरमध्ये ड्रग्ज तस्कराची दोन कोटींची इमारत जमीनदोस्त 
राष्ट्रीय

Srinagar Illegal Property Demolition | श्रीनगरमध्ये ड्रग्ज तस्कराची दोन कोटींची इमारत जमीनदोस्त

पुढारी वृत्तसेवा

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहिमेंतर्गत श्रीनगर पोलिसांनी रैनावारी परिसरात कथित ड्रग्ज तस्कराची सुमारे दोन कोटी रुपये किमतीची तीन मजली निवासी इमारत जमीनदोस्त केली.

ही इमारत रैनावारीतील मुमखान मोहल्ला येथील रहिवासी शेख तसद्दुक याची होती. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ नियंत्रण कायदा (एनडीपीएस ॲक्ट) अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल आहे. संपत्तीच्या तपासादरम्यान संबंधित तीन मजली काँक्रीट इमारत सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून उभारल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय ही मालमत्ता अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून उभारल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. या कारवाईमुळे सरकारी जमिनीचा मौल्यवान तुकडाही अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT