IAS Tukaram Mundhe  
राष्ट्रीय

Tukaram Mundhe | कणखर प्रशासक तुकाराम मुंढे यांचा संघर्षमय जीवनप्रवास येणार पुस्तकरुपात!

पुणे यथे १७ जुलै रोजी होणार पुस्तकाचे प्रकाशन

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली: आपल्या धडाडीच्या, पारदर्शक आणि जनहितवादी प्रशासनशैलीमुळे राज्यभर परिचित असलेले 2005 बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या जीवनप्रवासावर आधारित पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. एका कणखर प्रशासकाच्या खडतर आयुष्याचा आणि संघर्षमय वाटचालीचा वेध घेणारे हे पुस्तक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. न्यू ईरा पब्लिकेशनतर्फे या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण यांनी हे पुस्तक लिहिले आहे. येत्या १७ जुलै रोजी या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे होणार आहे.

सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची प्रशासकीय पदे भूषवली आहेत. नागपूर महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यासह विविध जबाबदारीच्या पदांवर काम करताना त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे आणि कठोर प्रशासनामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.

ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत भारतीय प्रशासकीय सेवेत स्थान मिळविण्यापासून ते विविध पदांवर कार्य करताना आलेल्या आव्हानांचा सामना करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी मानला जातो. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यश, प्रशासकीय अनुभव आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचा उलगडा या पुस्तकातून होणार असल्याची माहिती प्रकाशकांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT