विधानसभेचे रणशिंग ! Maharashtra Legislative Assembly file photo
राष्ट्रीय

विधानसभेचे रणशिंग !

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग मंगळवारी फुंकले गेले. महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व 288 मतदार संघांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल; तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आगामी पाच वर्षांसाठी राज्यात सत्ता भाजप महायुतीची की, महाविकास आघाडीची ते चित्रही निकालातून स्पष्ट होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यासोबतच विविध राज्यांतील 48 विधानसभा तसेच महाराष्ट्रातील नांदेड आणि केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणाही आयोगाने केली. यासह दोन्ही राज्यांत आचारसंहिताही लागू झालेली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीरसिंह संधू यावेळी उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम

  • 22 ऑक्टोबर अधिसूचना जारी

  • 29 ऑक्टोबर अर्जाची मुदत

  • 30 ऑक्टोबर अर्ज छाननी

  • 4 नोव्हेंबर माघारीची मुदत

  • 20 नोव्हेंबर मतदान

  • 23 नोव्हेंबर मतमोजणी

पैसे, अमली पदार्थ, मद्यवाटपावर कडक

नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत. सर्व मतदार केंद्रे दोन किलोमीटरच्या आत असावेत, अशा सूचनाही निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

झारखंड विधानसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी, तर दुसर्‍या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT