पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीमध्ये तिहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. यामध्ये दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागात अज्ञाताने एकाच कुटुंबातील तिघांची चाकूने भोकसून हत्या केली. मृतांमध्ये आई, वडिल आणि लहान मुलीचा समावेश आहे. आज दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता. राजेश तंवर, कोमल आणि कविता अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पहाटे पाच ते सातच्या दरम्यान हा खून झाला. सुमृत कुटुंबातील चौथा सदस्य बाहेर फिरण्यासाठी गेला असल्यामुळे बचावला आहे. पोलीस घटनास्थळी हजर आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.