TMC Leader Mukul Roy Is Admitted In Hospital
तृणमुल काँग्रेस नेते मुकुल रॉय Pudhari File Photo
राष्ट्रीय

तृणमुल काँग्रेस नेते मुकुल रॉय यांची प्रकृती चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय मुकुल रॉय यांची प्रकृती चिंताजनक आहे. माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांचा काही दिवसांपूर्वी त्यांच्या बाथरुममध्ये पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

माजी रेल्वे मंत्री मुकुल रॉय बुधवारी (दि.3) त्यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असली तरी गंभीर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता डॉक्टरांनी सांगितले की, मुकुल रॉय यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

डॉक्टर म्हणाले, "मुकुल रॉय यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे. आमचे डॉक्टर रात्रंदिवस त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत." तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांना न्यूरोलॉजिकल समस्येने ग्रासले आहे. भान हरवण्यापूर्वी त्याला उलट्याही झाल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

SCROLL FOR NEXT