नवी दिल्ली : ममता बॅनर्जी या विरोधकांचे नेतृत्व करू शकतात, या शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्याचे जोरदार ससमर्थन केले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीने ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचत मुख्य भूमिकेत यावे, असे आवाहन केले.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरीका घोष यांनी रविवारी शरद पवार यांच्या वक्तव्याचे जोरदार समर्थन केले आणि आता विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी मुख्य भूमिकेत आले पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले.
घोष म्हणाल्या, शरद पवार यांनीही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यामुळे त्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा एक महत्त्वाचा चेहरा बनाव्यात. ममता बॅनर्जी यांनी गेल्या १० वर्षात भाजपाला एकाही ठिकाणी जिंकू दिले नाही. तृणमूल काँग्रेसच्या विरोधात सातत्याने भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीच्या नेतृत्व करावे. जातीयवादी शक्तींच्या विरुद्ध लढण्याचा अनुभव आणि धारिष्ट्य त्यांच्याकडे आहे, असेही त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जी विरोधकांचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. त्या देशाच्या प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. त्यांनी संसदेत पाठवलेले नेते जबाबदार, कर्तव्यदक्ष आणि जागरूक आहेत.