बलात्कार-हत्‍या प्रकरणाचा पश्‍चिम बंगालमध्‍ये सुरु असणारा निषेध भाजपने "हायजॅक" केला आहे. यामागे पश्‍चिम बंगाल सरकार पाडण्‍यासाठी या निषेधाचा वापर सुरु आहे, असा अरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते साकेत गोखले यांनी केला आहे.  File photo
राष्ट्रीय

'कोलकाता बलात्‍कार-हत्या निषेध भाजपकडून 'हायजॅक'

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार-हत्‍या प्रकरणाचा पश्‍चिम बंगालमध्‍ये सुरु असणारा निषेध भाजपने "हायजॅक" केला आहे. यामागे पश्‍चिम बंगाल सरकार पाडण्‍यासाठी या निषेधाचा वापर सुरु आहे, असा अरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते साकेत गोखले यांनी केला आहे.

भाजपने 'ममता यांनी राजीनामा द्यावा' असा ट्रेंड चालवला

साकेत गोखले यांनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार-हत्‍या प्रकरणी भाजपचा आयटी सेल एक संघटित मोहीम चालवत आहे. 15 ऑगस्ट रोजी सीबीआयने प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर भाजपच्‍यावतीने सोशल मीडियावर 'ममता यांनी राजीनामा द्यावा' असा ट्रेंड चालवला गेला. पश्‍चिम बंगाल सरकार पाडण्‍यासाठी ममता यांनी राजीनामा द्यावा' असा ट्रेंड करून भाजपद्वारे एक संघटित मोहीम चालवली जात आहे. या प्रकरणाचे राजकारण करुन भाजपने निषेध पूर्णपणे हायजॅक केला आहे," असेही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

सीबीआयविरोधात एकही निषेध करण्यात आलेला नाही

पश्‍चिम बंगालमधील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधाचे आंदोलन जबदस्‍तीने आपल्‍या ताब्‍यात घेतले होते. सीबीआय या प्रकरणाचा तपास मागील पाच दिवस करत आहे. त्‍यांनी कोणतेही नवी माहिती या प्रकरणात दिलेली नाही; परंतु सीबीआयविरोधात एकही निषेध करण्यात आलेला नाही. कोलकात्याच्या रस्त्यावर आता खऱ्या आंदोलकांची जागा आता भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे," असा दावााही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमधून केला आहे.

ममतांविराेधातील 45 टक्के पोस्ट इतर देशांतील

साकेते गोखले यांनी दावा केला की भाजपने 'ममता मस्ट रिजाइन' ( ममता यांनी राजीनामा द्यावा ) हा हॅशटॅगचा ट्रेंड केला. मागील चार दिवसांमध्‍ये याबाबत दोन लाखांहून अधिक पोस्ट करण्यात आल्या. 'ममता मस्ट रिजाइन' हा हॅशटॅग वापरून पोस्‍ट तब्‍बल ९१ दशलक्षांहून अधिक लोकांपर्यंत पोहचवला. तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार-हत्‍या प्रकरणाचा निषेध करणारे " 'ममता मस्ट रिझिन' हॅशटॅग वापरत नाहीत, असा दावाही त्‍यांनी केला. पश्‍चिम बंगालमधील सरकार पाडणे हा एकमेव भाजपचा उद्‍देश आहे. 'ममता यांनी राजीनामा द्यावा' असा हॅशटॅग भाजप ट्रेंड करत आहे. विविध खात्यांद्वारे या हॅशटॅगच्या वापरामुळे इंटरनेट ट्रॅफिकमध्ये वाढ झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत विविध देशांमध्ये बॉट खाती वापरून हॅशटॅग वाढविला जात आहे. 'ममता मस्ट रिझिन' हॅशटॅग असलेल्या जवळपास 45 टक्के पोस्ट अमेरिका आणि रशिया, इरिट्रिया, नायजेरिया, कोलंबिया आणि सुरीनामसह इतर देशांतील आहेत, असा दावा साकेत गोखले यांनी केला आहे. तसेच तृणमूल काँग्रेस या "षड्यंत्राला चोख प्रत्युत्तर देईल, असेही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT