नवी दिल्ली: मोबाईल वापरकर्त्यांना त्रासदायक ठरणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि अनावश्यक व्यावसायिक संदेशांना आळा घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने मोठा निर्णय घेतला आहे. ट्रायने नव्याने लागू केलेल्या 'डिजिटल संमती' नियमांनुसार, ग्राहकांची स्पष्ट परवानगी मिळाल्याशिवाय कोणताही व्यावसायिक कॉल किंवा संदेश पाठवता येणार नाही, असा आदेश जारी केला आहे. यामुळे ग्राहकांची मोठ्या त्रासातून सुटका होणार आहे. याशिवाय डिजिटल अरेस्ट , ओटीपी किवा लिंकच्या माध्यमातून होणारी फसवणूकसुद्धा टळणार आहे.
ट्रायच्या निरीक्षणानुसार, ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस्विरोधात तक्रारी येत होत्या. अनेक व्यावसायिक कंपन्या ग्राहकांची संमती न घेता जाहिराती, ऑफर्स किंवा अन्य व्यावसायिक माहिती पाठवत होत्या. त्यामुळे ग्राहकांच्या गोपनीयतेचा भंग होत होता आणि त्यांना सतत त्रास सहन करावा लागत होता. नवीन नियमांनुसार, कंपन्यांना ग्राहकांकडून डिजिटल स्वरूपात स्पष्ट संमती घ्यावी लागणार आहे.
ही संमती मिळाल्याशिवाय कोणताही व्यावसायिक कॉल, एसएमएस किंवा प्रमोशनल मेसेज पाठवता येणार नाही. ग्राहकांनी दिलेली संमती कधीही मागे घेता येईल, तसेच त्याबर नियंत्रण ठेवण्याचा अधिकारही ग्राहकांकडे राहील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
ट्रायच्या या निर्णयामुळे ग्राहकांना अनावश्यक कॉल्स आणि संदेशांपासून मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ग्राहकांची गोपनीयता आणि अधिकार अधिक मजबूत होणार आहेत. ट्रायने दूरसंचार कंपन्यांना आणि व्यावसायिक संस्थांना नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून लवकरच हे नियम देशभर लागू होणार आहेत.
ग्राहकांनी स्पॅम कॉल्स किंवा संदेशांची तक्रार केल्यास संबंधित कंपन्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, असे ट्रायने स्मट केले आहे. या नच्या डिजिटल संमती नियमामुळे भारतातील मोबाईल वापरकत्यांना सुरक्षित आणि त्रासमुक्त संवादाचा अनुभाष मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्पॅम कॉल्स आणि आमिष दाखवणारे मोबाईल कॉल करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही वाइले आहे. कधी ओटीपी विचारून तर कधी लिंक पाठवून तर कधी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ग्राहकांना लुबाडले जात होते. ट्रायच्या आता या नव्या निगमामुळे अशा प्रकारांना आळा बसणार आहे.