Tiruvannamalai devotee stuck आंध्रप्रदेशातील तिरुवन्नमलाई येथील इडुक्कू पिल्लैयार मंदिरातून एक अनोखी घटना समोर आली आहे. या मंदिरामध्ये भाविक एक प्रथा पाळतात देवदर्शन झाल्यानंतर मंदिरासमोरील एका अरुंद दगडी खिडकीतून आरपार जातात. ही खिडकी इतकी अरुंद आहे की यातून एखादा सडपातळ व्यक्तीच बाहेर जातो. या खिडीकीतून जो सहज बाहेर पडतो त्याला मोक्ष मिळतो अशी समजूत आहे. यामुळे याला मोक्ष मार्ग म्हणतात. या खिडकीत अडकून श्वास गुदमरल्याने डी. मणिकुमार या भाविकाचा मृत्यू झाला.
नेमकी घटना काय घडली?
२४ जुलै रोजी रात्री आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील डी. मणिकुमार हे भाविक आपल्या कुटुंबासह या मंदिरात दर्शन आणि धार्मिक विधी करण्यासाठी आले होते. मंदिरातील गुहेसारख्या अत्यंत अरुंद मार्गातून ज्याला 'मोक्ष मार्गम' म्हणून ओळखले जाते. जात असताना ते अचानक पॅसेजमध्ये अडकले. जागेच्या कमतरतेमुळे आणि ऑक्सिजन कमी पडल्याने त्यांचा श्वास गुदमरून जागीच मृत्यू झाला. या गंभीर दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने आणि मंदिर व्यवस्थापनाने या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी तातडीने लोखंडी बॅरिकेड्स आणि धोक्याच्या सूचना देणारे फलक लावले आहेत.
या मंदिरात अनेक भाविक ही प्रथा पाळतात, पण सर्वांचेच वजन सारखे नसल्यामुळे प्रत्येकाला त्या अरुंद खिडकीतून पार होता येत नाही. जड, वजन जास्त असलेल्या व्यक्तिनां यातून पार होता येत नाही. पण काही जण खूप त्रास सहन करुन ही खिडीकी पार करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अशा दुर्घटना घडताता असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे
एक महिलाही अडकली मोक्षमार्गात
डी. मणिकुमार यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याच्या लगेचच आंध्र प्रदेशातीलच आणखी एक महिला भाविक त्याच पॅसेजमध्ये अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या सलग घडलेल्या घटनांनंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी भाविकांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली
मंदिर प्रशासनाने केल्या तात्काळ उपाययोजना
लोखंडी सळ्यांचा केला साचा
मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन लोखंडी सळ्या वेल्ड करून एक ठराविक रुंदीचे अंतर तयार करण्यात आले आहे. जे भाविक या सळ्यांच्या मधून सहजरीत्या जाऊ शकतील, त्यांनाच पुढे गुहेत जाण्याची परवानगी दिली जात आहे.
प्रवेशावर निर्बंध व सूचना फलक:
मंदिरात लावण्यात आलेल्या अधिकृत सूचना फलकानुसार अतिवजन असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आणि गंभीर आजार किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना या अरुंद 'मोक्ष मार्गात' प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
काय आहे मंदिराचे महत्व
हे मंदिर गिरिवलम मार्गावरील 'अष्ट लिंगम' मंदिरांपैकी सातवे मंदिर असलेल्या 'कुबेर लिंगम' मंदिराच्या जवळ स्थित असून, त्याचे व्यवस्थापन अरुणाचलेश्वरर मंदिराद्वारे केले जाते. भाविक मंदिराच्या मागील बाजूच्या अत्यंत अरुंद मार्गातून आत प्रवेश करतात आणि प्रार्थना करून समोरील बाजूने बाहेर पडतात, अशी या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे.